सर्कशीला ‘हुनर हाट’मुळे मिळाली नवसंजीवनी

Date:

मुंबई-सर्वांनाच  माहित आहे की कोविड-19 महामारीचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. परंतु अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे जगभरातील अनेक कलाकारांच्या जीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. ‘परफॉर्मिंग आर्टिस्ट, थेट मंचावर  कला सादर करणारे कलाकार हा शब्द म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर गायक, नर्तक, नाट्य कलाकार, स्टँड-अप कॉमेडियन येतात. मात्र, आपल्यापैकी किती जणांनी सर्कशीत काम करणाऱ्या कलाकाराचा कधी विचार केलाय ?

याचे कारण, विशेषत: भारतात, सर्कस हा एक कलाप्रकार म्हणून खूप मागे पडला आहे किंवा आपल्या अनेकांच्या विस्मृतीत गेला  आहे. सर्कशीने आपली लोकप्रियता गमावल्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु विस्मृतीत गेलेली कला पुन्हा तेवढ्याच ताकदीने सर्वांसमोर येण्यामागे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय हे एक प्रमुख कारण ठरले आहे.

मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाला  हुनर हाटमध्ये सर्कशीतल्या काही  कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. 

 हे त्या कलेला अभिवादन  आहे, जिने आपल्याला आपल्या लहानपणी रोमांचक कसरती दाखवून अमाप आनंद दिला. आणि प्रेक्षकांना काही काळ मंत्रमुग्ध करण्यासाठी कठोर परिश्रम करणार्‍या प्रत्येक कलाकाराला हा मानाचा मुजरा  आहे!

हुनर हाट –सर्जनशील जगाची ओळख

‘कला, खाद्यपदार्थांची मेजवानी आणि संस्कृती’ या ब्रीदवाक्याप्रमाणे, 12 दिवस चालणारे हे प्रदर्शन विश्वासार्ह आणि परिपूर्ण ‘स्वदेशी’ उत्पादनांसाठी वन स्टॉप शॉप आहे. देशभरातील 1000  कारागिरांना मदत  आणि प्रोत्साहन देण्याबरोबरच, हुनर हाटने गायक, नर्तक, विनोदी कलाकार तसेच सर्कशीत काम करणाऱ्या शेकडो  कलाकारांना या प्रदर्शनात  आपल्या कलेद्वारे मनोरंजन करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे.

विदूषक आनंदाचा स्रोत असू शकतो, परंतु या विदूषकाला  कोण हसवू शकते ? – अँजेला कार्टर

“प्रदीर्घ काळानंतर ‘सर्कस’ला देशात पुन्हा प्रतिष्ठा लाभली आहे,” असे रॅम्बो सर्कस ट्रूपचे मालक पी.टी. दिलीप म्हणाले. देशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध हुनर हाटमध्ये हे कलाकार आपली कला सादर करत आहेत.काही दिवसांपूर्वी चंदिगड शहरात ‘हुनर हाट’चे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा चंदीगडच्या नायब राज्यपालांनी कलाकारांना सन्मानित  केल्याची आठवण त्यांनी सांगितली.“आम्हाला स्मृतीचिन्ह आणि 11,000/- रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना आमच्यातील एक ज्येष्ठ कलाकार, बिजू नायर, जो विदूषक म्हणून काम करतो, त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले” असे त्यांनी सांगितले.

“ते केवळ पैसे नव्हते. माझे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि माझ्या आयुष्यात प्रथमच मला असा सन्मान मिळाला आणि तो देखील अशा प्रतिष्ठित व्यक्तीकडून मिळाला ” बिजू नायर अभिमानाने सांगत होते.सर्कसच्या सदाबहार कालखंडाची आठवण सांगताना, रॅम्बो सर्कस मंडळीचे  व्यवस्थापक राजीव बिरडिया  म्हणाले, “एक काळ होता जेव्हा लोक सर्कशीचे  तीन दिवस अगोदर आरक्षण करायचे.  ते येताना बरोबर खाद्यपदार्थ घेऊन  यायचे आणि एक तासाचा सर्कस शो पाहण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करायचे. कालौघात ही कला कशी लुप्त होत आहे याचे वेदनादायी वर्णन त्यांनी केले.  1998 मध्ये देशात सर्कशीचे 317 गट होते; आज केवळ 6 शिल्लक आहेत आणि महाराष्ट्रात केवळ एक – आमचा आहे.बदलत्या काळानुसार मोठ्या शहरांमध्ये प्रचंड भाडे असल्यामुळे सर्कस कलाकारांना राहायला योग्य जागा मिळत नाही, याचा उल्लेख त्यांनी केला. हुनर हाट त्यांना शहराच्या मध्यभागी आयोजित   जागा उपलब्ध करून देत आहे, तसेच कला सादर केल्याबद्दल  योग्य मानधन  आणि प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळत असल्याचे  त्यांनी नमूद केले.

 थोडा प्राणवायू देणारा फोन कॉल


महामारीमुळे सर्कसमध्ये सादरीकरण करणाऱ्या अनेक कलाकारांच्या जीवनावर किती वाईट परिणाम झाला होता हे देखील त्यांनी  सांगितले. असा उपक्रम सुरु केल्याबद्दल सरकारला भरभरून धन्यवाद देत ते  म्हणाले , “त्या परिस्थितीत पुढे काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते आणि त्याच वेळी आम्हाला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाकडून एक फोन कॉल आला. आम्ही ‘हुनर हाट’मध्ये आमची कला सादर करू शकतो का अशी विचारणा आमच्याकडे करण्यात आली.  कोविड-पश्चात काळात हा कॉल आमच्यासाठी प्राणवायूसारखाच होता.”

2021 सालापासून आमचा संच सतत हुनर हाटशी जोडलेला आहे आणि आम्ही विविध राज्यांमध्ये प्रवास करत अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या हुनर हाट मध्ये आमच्या कलेचे सादरीकरण केले आहे असे या कलाकाराने सांगितले. “पूर्वी आम्हाला केवळ एखाद्या राज्याच्या अंतर्गतच कला सादर करण्याची संधी मिळत असे पण आता सरकारच्या मदतीने आम्ही संपूर्ण देशभरात आमची कला सादर करू शकत आहोत,” त्यांनी  कृतज्ञतेने सांगितले.


देशभरातील कलाकार एका मंचावर


हुनर हाटमध्ये आपली कला सादर करणारे सर्कस कलाकार ईशान्य प्रदेशातील राज्ये, उत्तर भारतातील सर्व राज्ये, महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल अशा देशाच्या बहुतांश राज्यांतील असल्यामुळे येथे छोट्या पातळीवर संपूर्ण भारताचेच दर्शन होत असते. रॅम्बो सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा वयोगट 18 ते 35 वर्षे आहे आणि त्यात सहा महिला कलाकारांचा समावेश आहे. महिला कलाकारांमधील एक जण एकल पालक आहे. सर्कशीत रोमांचकारी जिम्नॅस्टिक्सचे प्रकार सादर करण्यासाठी त्यांना दर दिवशी दोन ते तीन तास सराव करावा लागतो असे त्या सर्वजणींनी सांगितले.


हुनर हाट –सर्कशीतील कलाकारांना पाठबळ पुरविणारा उपक्रम


तो म्हणाला या  सर्कशीतील कलाकारांचा संच 2021 पासून विविध ठिकाणी आयोजित झालेल्या हुनर हाटमध्ये कला सादर करत आहे आणि त्यामुळे सतत व्यस्त आहे. महाराष्ट्रात सुरु झालेल्या आणि कार्यरत असलेल्या रॅम्बो सर्कसमध्ये कलाकारांना आळीपाळीने सादरीकरणाची संधी दिली जाते. या पद्धतीमुळे कलाकारांच्या संचातील कोणीही कलाकार  मंत्रालयाने दिलेल्या संधीपासून आणि सादरीकरणापासून वंचित राहत नाही.
 “सर्कस म्हणजे अख्खे गाव तुमच्याबरोबर घेऊन जाणे असते. एका संचात सुमारे 300 जण असतात आणि तुम्हांला त्यातील प्रत्येकाची स्वतःच्या कुटुंबातील माणसाप्रमाणे काळजी घ्यावी लागते,” बिरडिया यांनी सांगितले.

कलेच्या सादरीकरणासाठी असा उत्तम मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रत्येक सर्कस कलाकाराने केंद्र सरकारचे तसेच अल्पसंख्याक मंत्रालयाचे आभार मानले आहेत. सरकारच्या या उपक्रमाने त्यांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला चालना दिली आहे असे ते म्हणाले.


 
तुम्ही तुमच्या मुलांना सर्कसला शेवटचे कधी घेऊन गेला होतात,आठवतंय?

आता तुम्ही त्यांना मुंबईत हुनर हाट येथे घेऊन जाऊन आनंदाचा मोठा ठेवा भेट द्या. शोच्या वेळा : दुपारी 1, 3 आणि 5 वाजता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...