केंद्र सरकारला महागाईची नाही वाटत लाज ..पुन्हा आठवडाभर राज्यभर आंदोलन- नाना पटोले

Date:

मुंबई -केंद्राकडून कृत्रिमरित्या महागाई वाढवली जाते, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. तसेच, महागाईमुळे जनतेवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. केंद्र सरकारला लाज वाटत नाही अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. तसेच, त्यामुळे या संवेदनहीन आणि निर्लज्ज सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष 31 मार्चपासून 7 दिवस महागाईच्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे पटोले म्हणाले.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सिलिंडरसह पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याविरोधात 31 मार्जपासून काँग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 31 मार्चपासून पुढे 7 दिवस काँग्रेसतर्फे महागाई सप्ताह पाळला जाणार असून गाव, तालुका, जिल्हा पातळीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

या राज्यव्यापी आंदोलनात जिल्हाप्रतिनिधीसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही सहभागी होतील. आंदोलनाच्या माध्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खरे रूप जनतेसमोर आणणार, असेही नाना पटोले म्हणाले.

136 दिवसांत दरवाढ का केली नाही?
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका असताना 136 दिवस केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह इतर वस्तुंच्या दरात एकदाही दरवाढ करण्यात आली नाही. मात्र, निवडणुका संपताच केंद्र सरकारकडून सामान्यांना लुटले जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...