Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत आहे – बाबा कांबळे

Date:

बेकायदेशीर दुचाकी विरोधात रिक्षा चालक मालकांचे आंदोलन

पुणे-रिक्षा चालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असताना ते सोडविण्याऐवजी त्यात आणखीन भर घालण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत आहे. बेकायदेशीर दुचाकी आणून रिक्षा चालकांच्या संकटात आणखीन भर घालण्याचे काम सरकारने केले आहे. तीन चाकाच्या सरकारचे रिक्षा चालकाकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला. तर केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले.बेकायदेशीर दुचाकी बंद करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुणे व पिंपरीतील रिक्षा चालक मालकांनी पुणे आरटीओ कार्यालवर आंदोलन छेडले. सकाळी दहा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते,

रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी पुणे शहरातील सर्व संघटना पुणे येथे एकत्र,आल्या , मुळे
२५ हजार रिक्षाचालक मालकांना एकत्र येऊन हा मोर्चा काढला पुणे आरटीओ समोर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले,

” ट्रान्सफर कमिटीमध्ये ओला उबेर मधील टू व्हीलर बंद करण्याचा ठराव पारित करून या वरती ताबडतोब बंदी आणून ओला उबेर मधून टू व्हीलर बुकिंग केले जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल,पुणे सायबर क्राईम ब्रँच यांच्यासोबत विभागाची बैठक सुरू असून कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने टू व्हीलर वाहतुकीबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत कायदेशीर बाकीचा तपास केला जात आहे, मुक्त परवाना बंद करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला असून लवकरच मुक्त परवाना बंद होईल,, आश्वासन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी मोर्चासमोर येऊन दिले,येत्या दोन दिवसात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन चक्काजाम करू असा इशारा देखील यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली
महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबासाहेब कांबळे , महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना किशोर चिंतामणी ,आम आदमी रिक्षा संघटना श्रीकांत आचार्य सल्लागा,संजय कवडे, पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना४ अंकुश नवले भाजपा वाहतूक आघाडी,फारुख बागवाले आशीर्वाद रिक्षा संघटना .अजिंक्य रिक्षा संघटना नितीन भुजबळ आदी प्रमुख संघटना यावेळी उपस्थित झाले होते, याप्रमाणे अंदाजे 22 रिक्षा संघटनांचा पाठिंबा मिळाला व या संघटना देखील सहभागी झाल्यात होत्या,

बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे दुचाकी सुरु असून ओला उबेरच्या या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्याच निषेधार्थ काही संघटनांनी बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली. मात्र ही हाक म्हणजे अत्यंत चुकीची आहे. कोविडमुळे अगोदरच त्रस्त व मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रिक्षा चालकांचे हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. आपला उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण, शाळा, महाविद्यालयाच्या फी अशा असंख्य प्रश्नांनी रिक्षा चालक त्रस्त आहेत. या परिस्थितीमध्ये रिक्षा बंद करून परत त्यांना आर्थिक फटका बसेल, असे बाबा कांबळे म्हणाले. केंद्र व राज्य सरकार हे गरिबांना एकमेकांमध्ये भांडवत आहे. उद्योजकांना मदत करत आहे. रिक्षा चालकांवरती अन्याय करत आहे. यामुळे बेकायदेशीर दुचाकी बंद झाली पाहिजे. रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे. वाढिव दंड रद्द झाला पाहिजे. मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे.
यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्यात नाईटक्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी

“हडफडेची पुनरावृत्ती नाही! गोवा सरकारची कठोर भूमिका; संयुक्त अंमलबजावणी...

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...

पार्थ अजित पवारांचा जमीन घोटाळा:शीतल तेजवानीने लपवून ठेवलेले दस्त अखेर जप्त

पुणे- कोरेगाव पार्क मुंढवा येथील सरकारी जमीन लाटण्यासाठी...