कोरोना कालावधीत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा पुरस्काराने गौरव

Date:

पुणे दि.२५: महिलांच्या विकासाच्यार विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यारत महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून राज्याचे सर्वसमावेशक महिला धोरण धोरण लवकरच जाहीर करण्यातत येणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. कोरोना कालावधीत आरोग्य यंत्रणेसह विविध क्षेत्रात महिलांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्या म्हणाल्या.

            पुणे येथे एफआयसीसीआयच्यावतीने कोरोना कालावधीत आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा मंत्री ॲड ठाकूर यांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उषा पुनावाला, राष्ट्रीय कुटुंब नियोजनच्या प्रमुख अवलोकिता माने,  नुपुर पवार, पुजा आनंद उपस्थित होत्या.

 ॲड. ठाकुर म्हणाल्या, आरोग्य यंत्रणेतील महिलांनी कोरोना कालावधीत जिवाची पर्वा न करता केलेले कार्य कायम स्मरणात राहणारे आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, त्या कामात मनापासून दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे असल्याने. कोरोना रुग्णसेवा करताना आरोग्य यंत्रणेतील महिलांनी दिलेल्या योगदानाला महत्व आहे. त्यामुळे या कर्तबगार महिलांचा सत्कार इतरांना निश्चितच सेवेची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या चौथ्या महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 श्रीमती पुजा आनंद यांनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...