पुणे-येत्या २१ डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’..या चित्रपटाकडे कुतूहलाने लक्ष वेधले जाते आहे . यात अनुपम खेर यांनी हुबेहूब मनमोहन सिंह साकारला आहे तर सुजेन बर्नर्ट नावाच्या अभिनेत्रीने यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी साकारली आहे .खेर हे अत्यंत अभ्यासू आणि उत्तम अभिनेते आहेत. या सिनेमाबाबत असे सांगितले जाते कि , २००४ ते २०१४ या काळातील राजकीय घटना यामध्ये जास्त प्रमाणात आहेत .
हि फिल्म म्हणजे मनमोहन सिंह यांची बायोपिक असे म्हटले जाते.अलीकडे अनुपम खेर यांनी एफटीआय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तत्पूर्वी त्यांनी या सिनेमाबाबत 2 व्हिडीओ शेअर केले आहेत ,जेव्हा या सिनेमाचा लास्ट सीन चित्रित केला गेला या सिनेमाचे चित्रीकरण पूर्णही झाले आहे ,खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मुळे कुतूहल निर्माण होते आहे .पहाच हा व्हिडीओ.. जसा अनुपम खेर यांनी शेअर केला तसाच्या तसा …