सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्वावर पॅसेंजर गाड्या चालवण्यासाठी अलिकडे कोणत्याही निविदा मागवण्यात आलेल्या नाहीत
नवी दिल्ली-
एका प्रमुख दैनिकात तसेच त्याच्या डिजिटल आवृत्तीत प्रकाशित बातमीमध्ये म्हटले आहे की भारतीय रेल्वेने प्रथमच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर प्रवासी गाड्यांच्या 150 जोड्या चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. तसेच या गाड्यांचे प्रवासी भाडे ठरवण्याचे स्वातंत्र्यदेखील खाजगी कंपन्यांना असेल असेही त्यात म्हटले आहे.या दिशाभूल करणार्या बातम्या फेटाळून लावत, रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि अलिकडे कोणत्याही निविदा मागवलेल्या नाहीत.त्यामुळे अशा बातम्यांमध्ये तथ्य नसून संबंधितांनी त्याची दखल घेऊ नये.