पुणे-पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडले होते. या घटनेतील मृत मुलीच्या कुटुबियांची भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मुलीचा दिव्यांग भावाला आपले दुःख व्यक्त करताना अतिशय वेदना होत होत्या. तरीही तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा व्हावी, अशी आर्ततेने मागणी करत होता. यावेळी श्री. पाटील यांनी कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
‘त्या’निघृण हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी – आ. चंद्रकांत पाटील
Date:

