नवी दिल्ली- मुंबईतील शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यांचेच भविष्य अजून निश्चित नाही, त्तेयांच्व्हाया गटालाही अजून मान्यता नाही , हेच फुटीरवादी नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेला कसे काय आव्हान देऊ शकतात शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त कशी काय करणार असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हा प्रकार सुरु आहे. त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम घडणार नाही. फुटीर गटाला अजूनही मान्यता नाही. लोकसभेतील शिवसेना अबाधित आहे. सोळा आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांनी घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथच बेकायदेशिर आहे. मला खात्री आहे की, या देशातील न्याय अद्याप मेलेला नाही. स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
खासदाराबाबतचे वृत्त म्हणजे काॅमेडी एक्स्प्रेस आहे. आमदार वाचवण्यासाठी भ्रम करण्याचा प्रयत्न आहे. विधीमंडळात काॅमेडी एक्प्रेसचा सीजन वन झाला, आता सीजन दोन सुरु आहे.
शिवसेना राजकीय पक्ष अधिकृत आहे. कोणत्या आधारावर शिंदे गट शिवसेनेवर हक्क सांगत आहेत हे मला माहित नाही. राजकीय कार्यकारणीला कोणताही अधिकार नाही. हे सर्व खोटेपणाच्या पायावर उभा आहे. एक फुटीर गट राजकीय पक्षाची कार्यकारणी कशी काय बरखास्त करु शकतो.

