पुणे :विवेक तायडे-
बहुचर्चित ‘तेरा सुरूर’ हा चित्रपट ११ मार्च २०१६ रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता हिमेश रेशमिया, फराह करिमी, नसिरुद्दीन शाह, शेखर कपूर, कबीर बेदी, मोनिका डोंग्रा यांच्या प्रमुख भूमिका. आपल्या गायकीने आजच्या तरुणाईवर मोहिनी घालणारा हिमेश रेशमियाने ‘आपका सुरूर’ या चित्रपटाद्वारे अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली. संगीत दिग्दर्शक म्हणून यश मिळविणाऱ्या हिमेशने चित्रपट संगीतामध्ये वेगवेगळ्या शैली रसिकांसमोर मांडल्या. त्याने गायलेल्या अनेक गीतांनी तुफान लोकप्रियता मिळवली. आपका सुरूर या चित्रपटाच्या निमित्ताने हिमेश प्रथमच अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. याच चित्रपटाचा सिक्वल ‘तेरा सुरूर’ ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये हिमेश रेशमिया मुख्य भूमिकेत आहे. हिमेशबरोबर हॉलंडची सुपर मॉडेल फराह करिमी देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.
याबरोबरीने जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह, अभिनेते दिग्दर्शक शेखर कपूर, कबीर बेदी, मोनिका डोंग्रा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘टी – सिरीज’च्या बॅनरखाली विपिन रेशमिया व सोनिया कपूर यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शॉन अर्रन्हा यांनी केले असून हिमेश रेशमिया यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात ६ गीते असून ही गीते अरजीत सिंग, दर्शन रावल, आदिती सिंग शर्मा, नीती मोहन, हिमेश रेशमिया, रीतीराज मोहंती यांनी गायली आहेत.