पुणे- अस्तित्वात असलेले १२५ सिग्नल्स स्मार्ट करण्यासाठी तब्बल १६५ कोटीचे टेंडर मंजूर करण्याच्या प्रकाराची चौकशी इडी मार्फत करावी अशी मागणी कॉंग्रेसचे माजी गटनेते आणि अभ्यासू नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केली आहे . ते म्हणाले कालच्या स्थायी समितीच्या सभेत मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी यात लक्ष घालावे.५ वर्षात या सिग्नलला अशी कोणती जादू करण्यात येणार आहे हे न सांगता एका कागदात हा प्रस्ताव करण्यात आला आनि ५ वर्षाच्या कालावधी साठी तो असल्याचे म्हटले गेले आहे. आयुक्तांनी यात खुलासा केला पाहिजे . हे टेंडर ३ वर्षे जुने असून , खास कंपनीने आपला माणूस यंत्रणेत बसवून हे टेंडर मान्य करवून घेतल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. या शिवाय मुळात १०२ कोटीचे टेंडर भाजपच्या एका नेत्या च्या आग्रहासाठी १६५ कोटीवर हे टेंडर नेल्याचाही आरोप शिंदे यांनी केला आहे. नेमके अरविंद शिंदे यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ….
अस्तित्वातील १२५ सिग्नल्स स्मार्ट करण्यासाठी १६५ कोटींचे टेंडर – स्थायी समितीचा कारभार (व्हिडीओ)
Date:

