पुणे, दि. 30 ः खासदार प्रकाश जावडेकर यांच्या स्थानिक विकासनिधितून दहा शाळांमध्ये ओपन जिमचे साहित्य बसविण्यात येत आहे. कोथरूड येथील विद्या प्रतिष्ठान संचालित श्री सरस्वती विद्यामंदीर आणि वनाझ परिवार शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये ओपन जिमचे उद्घाटन जावडेकरांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी जावडेकर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडिया आणि तंदुरुस्त रहा या मोहिमांमुळे देशभरात खेळाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, व्यायामाबाबत जनजागृती होत आहे. तब्येत चांगली करण्यासाठी पैसे लागत नाही, तर इच्छाशक्ती लागते. मुलांमध्ये खेळ आणि व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने दहा शाळांमध्ये ओपन जिम उभारण्यात येत आहेत. तेरा प्रकारच्या उपकरणांतून विद्यार्थ्यांना वीस प्रकारचे व्यायाम करता येतील.’
यावेळी प्रा. अनिल कुलकर्णी, अनिल व्यास, नारायण आचार्य, दादा ढवान, सुरेश विसपुते, यशवंत कदम, विनोद सकपाळ यांची यावेळी उपस्थिती होती.
खासदार जावडेकर यांच्या निधितून दहा ‘ओपन जिम’
Date: