दगडूशेठ गणपती मंदिरात दहा दिवसीय ‘अतिरुद्र याग’ संपन्न

Date:



श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांनी केले पौरोहित्य

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे मंदिरामध्ये ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत दहा दिवसीय अतिरुद्र याग आयोजित करण्यात आला होता. जगाच्या कल्याणाकरीता आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता अतिरुद्र याग मंदिरात करण्यात आला. दहा दिवस दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी पार पडले.

अतिरुद्र यागाची पूर्णाहुती मंगळवारी पार पडली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी उपस्थित होते. वेदमूर्ती नटराजशास्त्री आणि ब्रह्मवृंदांनी होम, विधी केले. महासंकल्प, महान्यास, रुद्र त्रिशदी अर्चना, गणेश सहस्त्रनाम अर्चना, रुद्रजप असे धार्मिक विधी करण्यात आले. यामध्ये १ लाख ३० हजार रुद्रजप, १७ लाख गणेश अर्चना, १७ हजार अथर्वशिर्ष आवर्तने, ३ हजार ५०० त्रिशदी अर्चना तसेच दररोज होमहवन करण्यात आले.

श्री गणेश, श्री सूर्यदेवता, भगवान शंकर, दुर्गा माता, महा विष्णू, मेधा दक्षिणा मूर्ती होम, महालक्ष्मी, नवग्रह, वास्तु देवता -अष्टदिशा आणि त्यानंतर पूर्णाहुती झाली. सभामंडपामध्ये भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम दररोज करण्यात आले. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे आरोग्यसंपन्न समाजाकरीता प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातील अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू ठरला. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले गेले. तसेच २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात आले. सर्व नद्यांचे एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...