पुणे, २३ ऑगस्टः “ सृष्टीवर प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल होतांना दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे उद्योग धंद्यांना कौशल्यपूर्ण कर्मचार्याची कमतरता जाणविणे. एकीकडे कुशल कामगारांची वाढती मागणी,कंपन्यांच्या गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात मोठी तफावतही दिसत आहे. या देशाच्या विकासाला गती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पनेसोबतच कुशल युवक गरजेचे आहेत.”असे विचार रबर केमिकल आणि पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष विनोद पटकोटवार यांनी व्यक्त केले.
कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कौशल्यावर आधारित एमएस्सी रोजगारभिमुख कार्यक्रम सुरू केला आहे. यावेळी औद्योगिक पॉलिमर रसायनशास्त्राचे विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी एनसीएलचे एमेरिटस सायंटिस्ट डॉ. प्रकाश वडगावकर, संशोधक संचालक डॉ. अपर्णा जोशी, के.डी. जोशी रबर इंडस्ट्रीज यांनी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, सुप्रसिद्ध वक्ते डॉ. संजय उपाध्ये, श्रीमती पटकोटवार आणि डॉ. वसी शेख हे उपस्थित होते.
विनोद पटकोटवार म्हणाले,“ वर्तमान काळानुसार कौशल्याच्या अंतराचे कारण , त्याचे परिणाम दूर करणे व ते योग्य रणनीतीने पूर्ण करणे ही काळाची गरज आहे. तसेच त्यांनी विद्यापीठाच्या औद्योगिक पॉलिमर रसायनशास्त्र कार्यक्रमाच्या अभ्यासक्रमात संशोधन, नवकल्पना आणि कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश करून सहा महिने अनिवार्य औद्योगिक इंटर्नशिप सोबत एकाच अभ्यासक्रमात विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांचा समावेश केल्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी भारतीय कौशल्य विकास परिषदेच्या वतीने राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ”
डॉ. आर.एम. चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना योग, ध्यान, आहार, फिटनेस, स्टार्टअप आदीबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मिलिंद पांडे यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून कौशल्य शिक्षण, डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, कृत्रिमता यांचे महत्व अधोरेखित केले. बुद्धिमत्ता, नवकल्पना आणि हॅकॅथॉनची माहिती दिली.
डॉ. वसी शेख यांनी प्रास्ताविक केले. डॉ. किरण कोकाटे यांनी आभार मानले.
तंत्रज्ञान व नवी कल्पना देशाच्या विकासाला गती देतील -विनोद पटकोटवार
Date:

