पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु

Date:

पुणे, दि. 11 : राज्यातील शिक्षक पदांची भरती प्रक्रियेची कार्यवाही पवित्र प्रणालीमार्फत सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 पदांसाठी एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्लूएस/खुल्या प्रवर्गात रुपांतरीत करुन पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 17 जुलै 2022 पर्यंत आपले प्रमाणपत्र अद्ययावत करावेत, असे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीसाठी 2 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2 हजार 62 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3 हजार 902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. प्रमाणपत्र अद्ययावत केल्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल.

एकूण 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करुन दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड 30 गुणांच्या आधारे आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...