पुणे, : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयाने जिल्हा परिषदेवर सोपविलेली शिक्षक पात्राता परीक्षा पेपर -2 दि.१६ जानेवारी २०१६ व शिक्षक पात्राता पुनर्परीक्षा पेपर -1 दि. 7 जून 2016 रोजी घेणेत आलेली होती. सदर परिक्षेचे पात्रता प्रामणपत्र घेण्यासाठी उमेदवारांनी उपस्थित रहावे असे अवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, सदर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षे चे प्रमाणपत्रा पेपर 1 संख्या १४६ व पेपर २ संख्या ५१७ एकूण 663 महाराष्ट्र राज्य परीक्ष परिषद पुणे या कार्यालया कडुन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांचेकडे पा्रप्त झालेले असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाण पत्र पेपर -1 साठी 8 नोव्हेंबर 20016 रोजी, पेपर-2 साठी दि. 9 नोव्हेंबर 2016 व पेपर 1 व 2 साठी दि. 10 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते 5.45 वाजता शिक्षण विभाग(प्राथमिक), नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षक पात्राता परीक्षेचे प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित राहावे.
उमेदवारांनी स्व:ता शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित रहावे.उमेदवारांनी येताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शुल्क भरलेल्या चलनाची मूळ प्रत व सत्य प्रत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिकेची प्रत, डी.टी.एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्राची सत्य प्रत अथवा बी.एड उत्तीर्ण गुणपत्रिकेची किंवा प्रमापत्राची सत्य प्रत दोनहीं परीक्षांच्या सत्य प्रती (परीक्षार्थीच्या अर्हतेनुसार) आरक्षण प्रवर्गाचे प्रमाणपत्र सत्य प्रत,निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक,आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड इत्यादी पैकी एक ओळखपत्र घेऊन उपस्थित रहावे.
00000