पुणे-
आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हंटले आहे.वीजबिल सवलतीची आश्वासने देताना बुद्धीभ्रंश झाला होता का? केजरीवाल कर्ज काढून नव्हे तर भ्रष्टाचार रोखून वीज बिल सवलत देत आहेत . जरा या मंत्रायंनी केजारीवालान्कडे शिकवणी लाऊन प्रथम शिकावे वीज कशी मोफत देता येते . असा टोला पुण्यातील आप ने असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला आहे .
आप चे मुकुंद किर्दत यांनी असे म्हटले आहे कि,’महामारीमुळे जनतेवर ही कर्ज काढून वीजबिल भरायची वेळ आली आहे दुसरीकडे सत्तेतील शिवसेनेने सवलतीचे आश्वासन वचननाम्यात दिले होते स्वतः राऊत यांनी दिवाळीत वीजबिल सवलतीचे आश्वासन दिले होते. तेव्हा या वस्तुस्थिती बाबत बुद्धीभ्रंश झाला होता का? असा हल्ला आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीवर केला आहे.दिल्लीत केजरीवाल कर्ज काढून नव्हे तर भ्रष्टाचार रोखून जनतेला ही वीजबिल सवलत देत आहेत हे यावरून जनतेने काय ते ओळखून घ्यावे अशी तिरकस टिपण्णी आप ने केली आहे.

