पुणे: टाटा स्काय या प्रामुख्याने भारतीय बाजारासाठी इंटरॅक्टिव्ह सेवा देण्यासाठी
नावाजल्या जाणाऱ्या भारतातील आघाडीच्या कंटेट वितरण सुविधेतर्फे एका आनंददायी बातमीने
यंदाच्या सणासुदीची सुरुवात होणार आहे. टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हलचे वेध सर्वांनाच लागले
असून दोन महिने चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सर्व काही असणार आहे – भारताच्या कानाकोपऱ्यातील
आणि जगभरातील सिनेमे तसेच पुरस्कारविजेते, कौतुक झालेले उत्तम चित्रपट. आणि विशेष म्हणजे हे
सिनेमे पुण्यातील तुमच्या घरी बसून तुम्हाला अगदी आरामात पाहता येणार आहेत. हे चित्रपट टाटा
स्कायवर स्टार आणि जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या सहयोगाने उपलब्ध असणार आहेत.
पुणेकरांना टाटा स्कायवर मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2017 मध्ये बरेच काही पाहता येणार आहे. या
वर्षी, नटरंग, फँड्री, व्हेंटिलेटर, तसे कुर्दी व गंगूबाई अशा मराठी सिनेमांसह अनेक इतर भाषिक
चित्रपटांचा समावेश देखील फेस्टिव्हलमध्ये असणार आहे.
कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता टाटा स्कायच्या सबस्क्रायबर्ससाठी 20+ सिनेमे उपलब्ध
करणाऱ्या यशस्वी 2016 टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल नंतर, कंपनीने आज अधिक मोठ्या व
उत्तम प्रतीच्या टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2017 ची घोषणा केली. यामार्फत टाटा स्काय
आपल्या सबस्क्रायबर्ससाठी भारतातील काही उत्तम सिनेमे सादर करणार आहे, जे अन्यथा पुण्यातील
प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नसते.
पुणे येथे लाँच करताना, टाटा स्कायचे चीफ कंटेट ऑफिसर अरुण उन्नी यांनी सांगितले, “उच्च
गुणवत्तेच्या व कौतुक झालेल्या सिनेमांचा मोठा प्रेक्षकवर्ग असल्याचे गेल्या वर्षी टाटा स्काय मुंबई
फिल्म फेस्टिव्हलला मिळालेल्या प्रतिसादातून निदर्शनात आल्याने, एकाहून एक सरस सिनेमे
शोधण्याचे व प्रेक्षकांसाठी सादर करण्याचे प्रोत्साहन आम्हाला मिळाले. टाटा स्काय स्वतःल एक कंटेट
व प्रेक्षकांच्या शोधाचे व्यासपीठ मानते व या व्यासपीठाचा उद्देश दरवर्षी अत्यंत दर्जेदार सिनेमे
जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर आणणे हा आहे. आमच्या व्याप्तीमुळे आम्हाला भारतात प्रामुख्याने
चित्रपट महोत्सव उपलब्ध नसणाऱ्या व मुख्य सांस्कृतिक केंद्रांपासून दूर असलेल्या प्रदेशांत चांगल्या
कलेला व उत्तम टॅलेण्टला पाठिंबा देणे शक्य होते.”
त्यांनी पुढे सांगितले, “आमच्या मते, ही सेवा प्रेक्षकांना केवळ चांगले सिनेमे देणारे ठिकाण यापेक्षाही
मोठी आहे. सिनेमा उद्योगाच्या दृष्टीनेही सिनेमा दाखवण्यासाठी हे आणखी एक व्यासपीठ ठरते.”
टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2017 ची ठळक वैशिष्ट्ये पुढील आहेत:
स्टार फॉर टीव्हीसह, जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या सहयोगाने खास सिनेमे : दोन
महिन्यांच्या कालावधीमध्ये दाखवले जाणार अंदाजे 30 चित्रपट
कौतुक झालेल्या, पुरस्कारविजेत्या उत्तम सिनेमांचा आणि नव्या तसेच अगोदर न पाहिलेल्या
कंटेटचा योग्य मेळ
भाषा: हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी, आसामी, मणिपुरी, आंतरराष्ट्रीय (सबटायटल्ससह)
कालावधी: 2 महिने (1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर)
येथे उपलब्ध: एचडीमध्ये चॅनल क्रमांक: #302 आणि एसडीमध्ये #303 (एकाच वेळी)
जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या संचालक अनुपमा चोप्रा यांनी सांगितले :“टाटा स्कायबरोबरची
आमची ही भागीदारी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारतात सिनेमाबद्दल प्रचंड प्रेम आहे.
अनेक फिल्ममेकर्स अप्रतिम कथा साकारत असतात. या खास व्यासपीठामुळे या सर्व कथा नव्या व
वैविध्यपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. टाटा स्कायवरील मुंबई फिल्म फेस्टिव्हल फिल्म बनवणाऱ्यांसाठी
व चित्रपटांचे चाहते असलेल्यांसाठी महत्त्वाचे आहे.