टाटा पॉवरने पुणे येथे भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट सुरु करण्यासाठी टाटा मोटर्ससोबत वीज खरेदी करार केला

Date:

पुणे-:  भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने आपल्या वाटचालीत आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे.  भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट उभारणीसाठी टाटा पॉवर व टाटा मोटर्स यांच्या दरम्यान वीज खरेदी करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या गेल्या.  या संपूर्ण प्रकल्पाची क्षमता ६.२ एमडब्ल्यूपी असणार आहे आणि त्यामुळे टाटा मोटर्सला आपल्या संपूर्ण जीवनकाळात १.६ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखता येईल अशी अपेक्षा आहे.

हे कारपोर्ट ग्रिडला जोडले जाणार असून या प्लांटमध्ये कारपोर्टमधील प्रचंड मोठ्या संरचना उभारणीसाठी उच्चस्तरीय अभियांत्रिकी आणि विशेष तयार करण्यात येणाऱ्या रचना आवश्यक आहेत.  अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि काटेकोर, तपशीलवार नियोजन ही टाटा पॉवरची बलस्थाने आहेत जी या प्रकल्पाच्या कार्यान्वयनामध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत.

या प्रकल्पाबद्दल टाटा पॉवरचे एमडी श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “वन टाटा उपक्रम म्हणून भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट उभारण्यासाठी टाटा मोटर्ससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  आम्हाला पक्का विश्वास आहे की कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हा वीज खरेदी करार अतिशय अनुकूल भूमिका बजावेल.  पर्यावरणस्नेही संसाधने शोधून काढून त्यांना आपल्या व्यावसायिक कामांमध्ये उपयोगात आणण्याचे नवनवीन मार्ग आम्ही भविष्यातही शोधत राहू.

नवीन प्रकल्पाबद्दल टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष – पीव्ही ऑपरेशन्स श्री. राजेश खत्री यांनी सांगितले, “टाटा पॉवरसोबत भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट उभारण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत  कारण यामुळे आम्हाला आमचे कार्बन उत्सर्जन रोखता येईल. भविष्यातील पर्यावरणस्नेही संचालन आणि ऊर्जा वापर यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी जागेच्या सक्षम वापराच्या दृष्टीने सोलर कारपोर्ट्स ही अतिशय उत्तम उदाहरणे असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.  भविष्यात रुफटॉप क्षेत्राच्या विकासासाठी कारपोर्ट्स खूप सक्षम ठरू शकतील. 

टाटा पॉवर सोलर ही टाटा पॉवरची सौरऊर्जा निर्मिती करणारी कंपनी असून एकाच ठिकाणी जगातील सर्वात मोठे रुफटॉप उभारण्याचा यशस्वी अनुभव टाटा पॉवर सोलरच्या गाठीशी आहे.  अमृतसर (१६ मेगावॅट), कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (२.६७ मेगावॅट), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया जगातील सर्वात मोठे सौरऊर्जेवर चालणारे क्रिकेट स्टेडियम (८२०.८ केडब्ल्यूपी), डेल बंगलोर येथे उभारण्यात आलेले सोलर व्हर्टिकल फार्म (१२० केडब्ल्यू), टाटा केमिकल्स, नेल्लोर येथे १.४ मेगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर आणि असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प टाटा पॉवर सोलरने उभारले आहेत.  त्याचप्रमाणे देशात सर्वत्र लोकांना सौरऊर्जेविषयी जागरूक करण्यासाठी घरांच्या छतांवर सौरऊर्जा रुफटॉप उभारणीचे काम देखील टाटा पॉवर सोलर मोठ्या प्रमाणावर करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...

स्काऊट क्रीडांगणावर मल्लखांब प्रात्यक्षिकांतून सुदृढ शरीर संपन्नतेचा संदेश 

श्री शिवाजी कुल, पुणे संस्थेतर्फे आयोजन ; स्व-रूपवर्धिनी च्या...