मुंबई, 12 सप्टेंबर 2022
टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ESMO) वैद्यकीय परिषदेमध्ये भारतीय ऐतिहासिक बहुकेंद्रीय स्तनाच्या कर्करोगाच्या अभ्यासाचे निकाल आज सादर केले. वार्षिक ESMO परिषद ही जगातील सर्वात प्रतिष्ठित कर्करोग परिषदांपैकी एक आहे आणि दरवर्षी युरोपमध्ये आयोजित केली जाते.
“लवकर निदान झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी ट्यूमरच्या भागात भूल देण्याचा, उपचार पश्चात त्यांच्या जगण्यावर होणार परिणाम’ हा अभ्यास एक यादृच्छिक नियंत्रित परीक्षण आहे, ज्याची संकल्पना आणि रचना डॉ. बडवे यांनी केली आहे, जे ह्या अभ्यासाचे प्रमुख संशोधक देखील आहेत आणि 2011 ते 2022 दरम्यानच्या 11 वर्षांच्या कालावधीत मुंबईतील टाटा स्मारक केंद्रासह भारतात 11 कर्करोग केंद्रांवर संशोधकांनी हे योजित केले आहे.
या अभ्यासात स्तन कर्करोगाचा लवकर निदान झालेल्या 1600 महिलांचा समावेश होता ज्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्याची योजना होती. यापैकी निम्म्या रुग्णांचा समावेश नियंत्रण गटामध्ये (गट 1) होता, त्यांना मानक शस्त्रक्रिया आणि त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांनुसार केमोथेरपी, हार्मोन थेरपी आणि रेडिओथेरपीसह शस्त्रक्रिया पश्चातच्या मानक उपचार मिळाले. इतर अर्ध्या रुग्णांना, जे अभ्यास गटामध्ये (गट 2) होते, त्यांना शस्त्रक्रियेच्या अगदी आधी, ट्यूमरच्या सभोवताली, सामान्यतः वापरली जाणारी एक स्थानिक भूल औषधीचे (0.5% लिग्नोकेन) इंजेक्शन मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर मानक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर नियंत्रण गटात दिल्या गेलेल्या शस्त्रक्रिया पश्चातच्या उपचारांनुसार उपचार केले गेले. डॉ. बडवे यांच्या मागील संशोधनाने असे सुचवले आहे की शस्त्रक्रियेद्वारे प्राथमिक कर्करोग काढून टाकण्याच्या अगदी अगोदर, दरम्यान आणि नंतर लगेचच एक संधी उपलब्ध असते जेव्हा कर्करोगविरोधी औषधाने रुग्णाच्या पुढील आयुष्यात प्रसारित स्टेज ४ (प्रगत अवस्था) च्या पसरणाऱ्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
लिग्नोकेन, जे सामान्यतः वापरले जाणारे आणि स्वस्त, स्थानिक भूल देणारे औषध आहे, त्याचे कर्करोगाच्या पेशींचे विभाजन, हालचाल आणि इतर कर्करोग-विरोधी गुणधर्मांवर प्रतिबंधात्मक प्रभावामुळे ते एक योग्य हस्तक्षेप असल्याचे मानले जाते.
ट्यूमर सभोवताली इंजेक्शनच्या तंत्राचे रेखाचित्रातून याविषयी माहिती मिळते. खाली दर्शविले आहे जे सोपे आहे आणि ज्यास कोणत्याही अतिरिक्त स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.
उपचार पूर्ण झाल्यानंतर नियंत्रण गट (गट 1) आणि स्थानिक भूल गट (गट 2) यांच्यातील बरे होण्याच्या दरांची आणि जगण्याच्या दरांची तुलना करण्यासाठी रुग्णांचा अनेक वर्षे नियमितपणे पाठपुरावा करण्यात आला. जेव्हा दोन्ही गटांमध्ये पुरेसा पाठपुरावा झाला तेव्हा सप्टेंबर 2021 मध्ये उपलब्ध डेटाचे विश्लेषण केले गेले. अपेक्षेप्रमाणे, लिग्नोकेन प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये विषाक्तता नव्हती. 6 वर्षांचे रोग-मुक्त जगणे (बरा होण्याचा दर) नियंत्रण गटात 81.7% आणि स्थानिक भूल देण्याच्या गटात 86.1% होता आणि स्थानिक भूल देऊन कर्करोगाच्या पुनरावृत्ती किंवा मृत्यूच्या जोखमीमध्ये 26% सापेक्ष घट झाली, जी सांख्यिकीयदृष्ट्या महत्वाची होती. त्याचप्रमाणे दोन गटांमध्ये 6 वर्षांत रुग्णांचे एकूण जगणे 86.2% च्या तुलनेत 89.9% होते आणि स्थानिक भूल देणार्या इंजेक्शनने मृत्यूच्या जोखमीत 29% घट झाली, जी देखील सांख्यिकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची होती. कालांतराने दोन अभ्यास गटांमध्ये रोगमुक्त जगणे आणि एकूण उत्तरजीविता खाली चित्रित करण्यात आले आहे.
रोगमुक्त जगणे
एकूण उत्तर जीविता
हे फायदे लक्षणीय आहेत आणि हस्तक्षेपाने (औषधीने) प्राप्त झाले ज्याची किंमत प्रति रुग्ण रु. 100/- पेक्षाही कमी होती. ह्याच्या तुलनेत, लवकर निदान झालेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या रूग्णांमध्ये अधिक महाग, लक्ष्यित औषधांद्वारे खूपच कमी प्रमाणात फायदे साध्य केले गेले आहेत ज्याची किंमत प्रति रुग्ण दहा लाखांपेक्षा जास्त आहे.
डॉ. बडवे यांच्या सादरीकरणानंतर त्यांनी लगेचच पॅरिसमधून आपली प्रतिक्रिया दिली, ” जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास आहे, ज्याने शस्त्रक्रियेपूर्वी एकल हस्तक्षेपाने मोठा फायदा दर्शविला आहे. जगभरात लागू केल्यास, ह्याने दरवर्षी 100,000 पेक्षा जास्त जीव वाचवता येईल. शास्त्रज्ञांसाठी, शस्त्रक्रियेच्या [निरीक्षण] कृतीवर कर्करोगाची घातक प्रतिक्रिया टाळण्यासाठी कर्करोगाच्या वातावरणात अशा प्रकारे सुधारणा करण्यासाठी हे शस्त्रक्रिया पूर्वी हस्तक्षेपाचे पर्याय निर्माण करते. टाटा स्मारक केंद्र आणि अणुऊर्जा विभागाचे ध्येय भारतीय आणि जागतिक लोकसंख्येच्या फायद्याकरिता, कर्करोगासाठी कमी खर्चात हस्तक्षेप विकसित करणे आहे आणि अणुऊर्जा विभागाद्वारे समर्थित हा अभ्यास आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
टाटा स्मारक केंद्र मधील मेडिकल ऑन्कोलॉजीचे प्रोफेसर, आणि ACTREC चे संचालक, डॉ. सुदीप गुप्ता, जे अभ्यासाचे एक सहायक संशोधक देखील आहेत, ते म्हणाले: “हा अभ्यास स्तनाच्या कर्करोगावर एक स्वस्त आणि तात्काळ लागू करण्यायोग्य उपचार प्रदान करतो ज्याचा उपयोग या आजारावर उपचार करणाऱ्या प्रत्येक सर्जनद्वारे केला जाऊ शकतो. मोठ्या यादृच्छिक चाचणीचे परिणाम, जे नवीन उपचारांच्या महत्वाचे मूल्यमापन करण्याचा सुवर्ण-मानक मार्ग आहे, ते या तंत्राच्या वापरास समर्थन देण्यासाठी सर्वोच्च पातळीचे पुरावे प्रदान करतात. हा अभ्यास याचा पुरावा आहे की भारतीय केंद्रे जागतिक प्रभाव असणाऱ्या अभ्यासाची रचना आणि आयोजन करू शकतात.”
अभ्यास संघ:
क्रमांक | संस्थेचे नाव | संशोधक |
टाटा स्मारक केंद्र, मुंबई, | डॉ. राजेंद्र बडवेडॉ. सुदीप गुप्ताडॉ. वाणी परमारडॉ. नीता नायरडॉ. शलाका जोशीकु. रोहिणी हवालदारकु. शबिना सिद्दीकीश्री. वैभव वनमाळीकु. अश्विनी देवडेकु. वर्षा गायकवाड | |
कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूर | डॉ. सूरज पवार | |
मॅक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, पटपरगंज, नवी दिल्ली | डॉ. गीता कडयप्रथ | |
बी. बोरूआ कॅन्सर इन्स्टिट्यूट, गुवाहाटी | डॉ. बिभूती भुसन बोरठाकूर | |
बसवतारकम इंडो-अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, हैदराबाद | डॉ. सुब्रमण्येश्वर राव थम्मिनेदी | |
गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, अहमदाबाद | डॉ शशांक पांड्या, | |
मलबार कॅन्सर सेंटर (MCC), कोडियेरी, थलासेरी, कन्नूर | डॉ. सठेसन बी | |
सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, मिरज | डॉ.पी.व्ही.चितळे _ | |
स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे | डॉ. राकेश नेवे | |
नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस (NEIGRIHMS), शिलाँग, | डॉ. कॅलेब हॅरिस | |
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली | डॉ. अनुराग श्रीवास्तव |
अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल सेंटर: 9821298642