तनिष्कचे रिटेल स्टोअर आता पुण्यात; ब्रैंडचे अत्याधुनिक कलेक्शनने सजलेल्या दोन नवीन रिटेल दुकानांचे पुण्यात उद्घाटन
पुणे : तनिष्क हा भारताचा सर्वात मोठा ज्वेलरी ब्रैंड असून पुण्यामध्ये दोन नवीन रिटेल स्टोअर्सचे उद्घाटन केल्याचे कंपनीने आज जाहीर केले आहे. अनुक्रमे सिंहगड रोड व औंध याठिकाणी ही 190 व 191 क्रमांकाची दुकाने असून तनिष्कच्या मोठ्या व वाढत्या नेटवर्कचा एक भाग आहेत. टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी विभागातील रिटेल व मार्केटींग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.संदिप कुल्हाली आणि टायटन कंपनी लिमिटेडच्या पश्चिम प्रादेशिक व्यावसाय प्रमूख श्री अरुण नारायण यांच्या हस्ते या दुकानांचे उद्घाटन झाले.
सिंहगड येथील स्टोअर 3500 चौरस फुट तर औंध येथील स्टोअर 5000 चौरस फूटाचे असून त्यामध्ये हिरे व ड्युअल टोन्ड गोल्ड फ्लोरल प्रेरणेतून साकारलेले मेहेक कलेक्शन तसेच समकालीन हिरे दागिन्यांचे झुहूर कलेक्शन असे दागिन्यांचे अत्याधुनिक कलेक्शन येथे आहे.या दुकानांमध्ये चांगल्या दर्जाचे हिरे आणि हिरे जडित दागिनेही उपलब्ध आहेत.
या शुभारंभानिमित्त, तनिष्कने या दोन्ही दुकानांमध्ये दि. 26 ते 28 फेब्रुवारी 2016 दरम्यान विशेष ऑफर दिली असून त्यानुसार 10 ग्रॅम सोने दागिन्यांच्या खरेदीवर किंवा रु. 8000/- किंमतीच्या हिरे दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीवर 0.20 ग्रॅमचे सोन्याचे नाणे ग्राहकांना भेट मिळणार आहे. याशिवाय निवडक हिरे दागिन्यांवर ग्राहकांना 20 टक्केपर्यंतची सवलत दिली जात असून ही ऑफर 29 फेब्रुवारी 2016 पर्यंतच आहे. श्रेणीतील सर्वात चांगले हिरे दागिन्यांसह या दुकानामध्ये वेडींग कलेक्शनचे अत्याधुनिक डिझाईन्सही येथे उपलब्ध आहेत. साधे सोने, कुंदन आणि पोल्की डिझाईनमध्ये विशेष हस्ताकलाकृत दागिनेही उपलब्ध आहेत. वेडींग ज्वेलरी व्यतिरिक्त, विस्तृत श्र्णीतील हिरे, पुरातन आणि फॅशन ज्वेलरीही निवडण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध आहे. भारतातील गौरवशाली मंदिरांच्या प्रेरणेतून डिझाईन केलेले आकर्षक सोन्याचे दागिन्याचे दिव्यम कलेक्शन पासून, तनिष्कच्या मिया कलेक्शनमधील कामाच्या ठिकाणी वापरायचे आकर्षक दागिने ते उत्कृष्ट हिरे आणि मौल्यवान रत्नजडित दागिन्यांचे कलेक्शन येथे आहे. हे कलेक्शन फराह खान यानी तनिष्क कलेक्शनसाठी डिझाईन केलेले असून – प्रत्येक स्त्रीसाठी खरेखुरे तनिष्क दागिने आहेत.
याप्रसंगी बोलताना, टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी विभागातील रिटेल आणि मार्केटींग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.संदिप कुल्हाली म्हणाले की, ‘सांस्कृतिक वारसा आणि त्याचवेळी अत्याधुनिकता जपणार्या पुणे शहरात दोन नवीन दुकाने सुरु होत असल्याचे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. पुणे हे तनिष्कसाठी फार महत्वाची बाजारपेठ आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ठ कारागिरी, आकर्षक डिझाईन्स आणि आश्वासक उत्पादक दर्जा पुरविण्यास कटीबध्द आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना श्रेणीतील सर्वोत्कृष्ट दागिनेच फक्त देत नाही तर, सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवेसह एक समग्र शॉपींग अनुभवही प्रदान करतो. स्त्रीयांची ब्रैंडेड ज्वेलरीला पसंतीचे प्रमाण वाढत असून त्यांच्या गरजेनुसार पुर्तता करण्यास आम्ही आनंदी आहोत.’
टायटनचा हॉलमार्क आणि टाटा ग्रुपचा विश्वास धारण केलेला तनिष्क ब्रैंड, आपल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट दागिने पुरण्यात आघाडीवर आहे. या नव्या दोन दुकानांमुळे पुण्यातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत तनिष्क पोहचेल तसेच अगदी पारंपारिक पासून समकालीन पर्यंत प्रत्येक स्त्रीची दागिन्यांची गरज पूर्ण करेल.
या स्टोअरमध्ये अत्याधुनिक कॅरामिटर असून त्याद्वारे सोन्याची शुध्दता अचूकपणे मोजता येते आणि जुन्या सोन्यासाठी सर्वोत्कृष्ट एक्सचेंज मुल्य देण्याचे आश्वासन देते. तनिष्कमध्ये दागिने खरेदी विक्रीबाबत संपूर्णपणे पारदर्शकता जपलेली आहे.