पुणे- तामिळनाडू मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन तीन दिवसाचा निवासी कोर्स सीआरटी पुणे येथे संपन्न झाला .देशात प्रथमच महाराष्ट्र राज्य बाहेरील सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग कोर्स संचालकांची राज्याबाहेरील पहिली बॅच संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्या माध्यमातून तामिळनाडूतील 38 ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये भाग घेतला तामिळनाडू मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने या कोर्ससाठी समन्वयक म्हणून देवी मन वरण संचालक श्रीदेवी मोटर ड्रायव्हिंग स्कूल तामिळनाडू यांच्या माध्यमातून ही बैठक संपन्न झाली याचे उद्घाटन डॉ कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील सी आय आरटी पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजय झोपे प्राचार्य सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आळेफाटा पुणे शेखर ढोले रस्ता सुरक्षा विभाग प्रमुख सी आय आर टी पुणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे ते संजय ससाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे प्रशांत काकडे सी एम डी सी सी आय आर टी पुणे देवी मनवलन मुख्य समन्वयक तामिळनाडू मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन अनंत कुंभार अध्यक्ष पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन व राजू घाटोळे अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आदी मान्यवर सदर प्रसंगी उपस्थित होते सदर प्रसंगी रस्ता सुरक्षा त्यादृष्टीने ट्रॅफिक सिग्नल रोल मॉडेल चे उद्घाटन कॅप्टन राजेंद्र सनेरपाटील यांच्या शुभहस्ते पार पडले ट्रॅफिक सिग्नल रोल मॉडेल अमोल बुरडे एक्सपर्ट मोटर ड्रायव्हिंग स्कूल ठाणे व सागर नारके यांनी तयार केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत काकडे यांनी केले आभार प्रदर्शन दत्तात्रय माने यांनी केले.
तामिळनाडू मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन तीन दिवसाचा निवासी कोर्स संपन्न
Date:

