नव्या वर्षात ‘झी टॉकीज’वाहिनी रसिकांची मनं जिंकणारे उपक्रम घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालीआहे. सर्जनशील अभिव्यक्ती म्हणून ज्याकडे प्रामुख्याने पाहिले जाते ती कलाकृती म्हणजे लघुपट. लघुपटांना खरंतर महत्त्वपूर्ण स्थान असलं तरीही त्यांना मिळणारं व्यासपीठ मात्र पुरेसं नसतं आणि म्हणूनच ‘झी टॉकीज’ वाहिनीने ‘टॉकीज लाईट हाऊस’ची निर्मिती केली. १० जानेवारीपासून प्रसारित झालेला ‘टॉकीज लाईट हाऊस’हा स्तुत्य उपक्रम रसिकांसाठी दर्जेदार लघुपटांची पर्वणी ठरतोय. लघुपटांसोबतच लघुपटकर्त्यांनाही प्रकाशझोतात आणणारं ‘झी टॉकीज’आता पुढच्या टप्प्यात लघुपटांसाठी स्पर्धा आयोजित करित आहेत.आपल्या कलागुणांची जादू ह्या स्पर्धेअंतर्गत छोट्या पडद्यावर दाखवण्याची नामी सुवर्णसंधी आता प्रत्येकाला मिळू शकते.
‘टॉकीज लाईट हाऊस’मध्ये आपण आत्तापर्यंत जगभरातील विविध भाषेतील निवडक लघुपट पाहिले. सुरुवातीच्या टप्प्यात कॉलेज विद्यार्थ्यांपासून ते जाणकार दिग्दर्शकांपर्यंतचा सहभाग आपण पाहिला. लघुपटांद्वारे आपल्या कल्पनांना आकार देणाऱ्या कलावंताना ‘झी टॉकीज’ आता आणखी एक अनोखी संधी उपलब्ध करून देणार आहे. २१ फेब्रुवारीपासून २७ मार्चपर्यंत चालणाऱ्या ‘टॉकीज लाईट हाऊस’ कॉन्टेस्टमध्ये तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकता. याबाबत अधिक माहितीसाठी ‘झीटॉकीज’वाहिनीच्या वेबसाईटला (http://www.zeetalkies.com)भेट देऊ शकता.
ओपन (खुल्या) तसेच प्रोफेशनल (व्यावसायिक) अशा दोन विभागांतर्गत तुम्ही तुमच्या लघुपटांची एन्ट्री करू शकता. व्यावसायिक विभागात जाणकार दिग्दर्शक तर खुल्या विभागात नवे होतकरू कलाकार आपली कलाकृती स्पर्धेसाठी पाठवू शकतील. ‘झी टॉकीज’तर्फे पहिल्यांदाच तुमच्या कल्पना, मित्रमंडळी, नातेवाईकांची तसेच शाळा, महाविद्यालयाचीगोष्टपोहचवण्याची संधीतुम्हालामिळणार आहे.चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या चाचणीतूनअंतिम फेरीसाठीचे विजेते निवडले जातील. ही स्पर्धा जिंकणाऱ्या लघुपटांनालाखांपर्यंतची बक्षिसे जिंकता येतील तसेच प्रथम क्रमांक मिळवणारा विजेता लघुपट ‘टॉकीज लाईट हाऊस’ मध्ये दाखवण्यात येईल.
‘झी टॉकीज’ वाहिनीची वेबसाईट – http://www.zeetalkies/talkieslighthouse वरील रजिस्ट्रेशन फॉर्म मधल्या रकान्यांमध्ये आपली माहिती भरावी. तसेच सोबत लघुपटाची url link जोडावी अथवा लघुपटाची डीव्हीडी ‘झी टॉकीज’च्या A विंग, मेरेथॅान फ्युचरएकस,ना.म.जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई या पत्त्यावर पाठवावी. सर्व गटातील सहभागी कलाकारांनी त्यांचा लघुपट मोबाईल कॅमेरा अथवा डीएसएलआर द्वारा चित्रित केलेला असावा. लघुपट संपूर्ण HD (1080p/720p) गुणवत्तेचा असावा तसेच फॉरमॅट – mp4 अथवा mov असणं गरजेचा आहे.खुल्या आणि व्यावसायिक अशा दोन्ही विभागांसाठी लघुपटांना २५ मिनिटांची मर्यादा आहे. लघुपटांसाठी वापरण्यात आलेले संगीत अथवा पार्श्वसंगीत हे कुठल्याही रॉयल्टी अंतर्गत येणार नाही याची कृपया खबरदारी घ्यावी. तुमच्या मनात काही शंका अथवा प्रश्न असतील तर तुम्ही ZeeTalkies@zee.esselgroup.com या मेल आयडीवर संपर्क साधू शकता.

