‘तालीम’चा संगीतप्रकाशन सोहळा संपन्न

Date:

एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ असलेली कुस्ती लवकरच मराठीचित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन केल्यानंतर थेट मराठीत दिग्दर्शनाकडे वळलेल्या नितीन मधुकर रोकडे यांच्या ‘तालीम’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत. रघुजन फिल्म्स, रोअरिंग गोट मीडिया आणि एनएमआर मूव्हीज या बेनरअंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे ‘तालीम’ चित्रपटाची निर्मिती करीत असून येत्या 15 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रघुजन फिल्म्स, रोअरिंग गोट मीडिया आणि एनएमआर मूव्हीज या बेनरअंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे,संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे यांची निर्मिती असलेल्या ‘तालीम’ या संगीतप्रधान चित्रपटाचा संगीतप्रकाशन सोहळा नुकताच ऑर्किड हॉटेल येथे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते सुदर्शन इंगळे, संजय मुळे,जयआदित्य गिरी, दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे, कलाकार अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, विष्णू जोशीलकर, प्रशांत मोहिते, गीतकार मंदार चोळकर, संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर, केमेरामन फारूख खान,गायिका आनंदी जोशी, तरन्नुम मलिक, रोंकणी गुप्ता, गायक स्वप्निल गोडबोले, अभिरूप तसेच बॉलिवूड तसेचमराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘तालीम’मध्ये एकूण 5 गीतांचा समावेश असून सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर याने ही गीते
लिहिली असून संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी या गीतांना संगीत दिले आहे. ‘‘तालीम रंगू दे…’’ हे शीर्षकगीत आदर्श शिंदे आणि तरन्नुम मलिक यांनी गायलं आहे. ‘‘इश्काचा बाण सुटला…’’ ही धडाकेबाज लावणीरोंकणी गुप्ता आणि स्वप्निल गोडबोले यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आहे. ‘कळा ना यो कळा ना…’’ हे विरहगीत दिव्यकुमार आणि कल्पना पोटवरी यांनी तर ‘‘रंगात रंग वेगळा…’’ हे प्रेमगीत आनंदी जोशीआणि फरहाद भिवंडीवाला यांनी गायलं आहे. ‘‘बे एके बे…’’ हे धम्माल गीत या चित्रपटात दोनदा दिसणार असून अनुक्रमे अभिरूप तसेच स्वप्निल गोडबोले यांनी हे गाणे गायलं आहे. मंदार चोळकरच्या लेखणीतून आकाराला आलेल्या या गीतांना संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर याने अप्रतिम स्वरसाज चढवला आहे.‘तालीम’च्या माध्यमातून कुस्तीचं पुनरागमन होत असलं तरी या चित्रपटात जीवनातील सर्व रंग पाहायला मिळणार असल्याचं मत दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “हा चित्रपट केवळ कुस्तीवर आधारित नाही, यात एक सशक्त कथानकही आहे, जो रसिकांना खिळवून ठेवेल. त्याला सुमधुर गीत-संगीताची जोड देण्यात आलेली आहे. चित्रपटाच्या कथेची गरज ओळखून त्यात गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
यातील प्रत्येक गाणे कथानकाशी एकरूप होणारं असून चित्रपटाची गती वाढवणारं आहे. गीतकार मंदार
चोळकरने अतिशय मार्मिक शब्दांमध्ये चित्रपटातील अचूक भाव शब्दांद्वारे गीतात व्यक्त केले आहेत. त्यावर संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर याने कान तृप्त करणारं संगीत दिलं आहे. आजच्या तरूणाईसोबतच प्रत्येकवयोगटातील संगीतप्रेमींना ‘तालीम’मधील गीते नक्कीच आवडतील. मराठी आणि हिंदीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात ‘तालीम’मधील गीतरचना  रसिकांना ऐकायला मिळेल .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...