मुंबई- २२ मार्च पासून प्रसारमाध्यमकर्मीना कामावरुन काढणे,पगार न देणे आदी अन्याय करणा-या माध्यमांच्या मालकांवर सरकारने बिनदिक्कतपणे , न घाबरता कारवाई करावी , राज्यभरात अशा माध्यमांनी मिळवलेल्या जमिनी, सरकारने दिलेले भूखंड तातडीने काढून सरकारने ताब्यात घ्याव्यात ! त्यांच्या अधिस्वीकृती देखील रद्द कराव्यात अशी मागणी एन यु जे च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.
कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर काही दिवस वृत्तपत्रे बंद होती . त्याचा फायदा घेऊन काही माध्यमांनी आपल्याकडील माध्यम कर्मींना बेकायदेशीर रित्या कामावरून घरी बसविले. काहींचा पगार दिला नाही . असे प्रकार मोठ्या प्रमाणात झालेत पण याबाबत कोणीही तक्रारी घेताना दिसत नाही अगर कारवाई करताना दिसत नाही . सरकारने याबाबत ठोस भूमिका अंगीकारून निडर बाणा दाखवून द्यावा आणि अन्यायग्रस्त माध्यमकर्मींना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी करदेकर यांनी केली आहे.

