पिंपरी-
महात्मा गांधी जयंती निमित्त मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्राबरोबरच जगभरातून संत ज्ञानेश्वर माउलीचे दर्शन घेण्यासाठी आणि आळंदी पाहण्यासाठी भाविक येत असतात. इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मात्र, नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात कचर्याचे साम‘ाज्य झाले आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
माउलीचे दर्शन घेऊन इंद्रायणी नदीच्या तीरी आळंदीचे नगरसेवक अविनाश तापकीर यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. संघातील सर्वानी पूर्ण नदीपात्र आणि घाट परिसर स्वच्छ केला. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे, माधव मनोरे, सूर्यकांत कुरुलकर, मधुकर चौधरी, श्रीधर साबळे, सुनील शिंपी, भरत वाघमारे, भरत गोरे, विष्णु केकाने, धनंजय सागर, सतीश बुळे, ज्ञानेश्वर कुर्हाडे, संतोष मुठाळ, अनिल सुतार रणजित घुमरे, बंडू सोनवणे, किसनराव पालवे, बळीराम माळी, दीपक जाधव , विनायक भोसले, मंजुनाथ कांबळे, संजय माळी, संजय घुमरे, अमित माळी, शहाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानाप्रसंगी अरुण पवार म्हणाले, आज नदीप्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. पर्यावरणाचे संवर्धन आपणच वेळ काढून केले पाहिजे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण स्वच्छता अभियान चालू ठेवले, तर सर्व नद्या, परिसर स्वच्छ होईल. तन-मन-धन अर्पण करून निस्वार्थपणे सेवा केल्यास फळ हे चागलेच मिळत असते.
माधव मनोरे म्हणाले, धर्माने काम केल्याशिवाय जगात काहीच साध्य होत नाही. सर्वांनी मिळून स्वच्छतेचे काम केल्यास पर्यावरण रक्षण होण्यास मदत होणार आहे. ह.भ.प. रामचंद्र राजभाये महाराज म्हणाले, की कर्म हे सुबक आणि तेजस्वी असावे. निष्ठेने केलेल्या कामालाच चांगले रूप येते. या स्वच्छता अभियानामुळे सर्व आळंदीकर समाधानी आहेत.
विजय सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

