बाल-कुमारांच्या कवितांनी रसिकांना केले विचारप्रवृत्त

Date:

पिंपरी :
‘लहान तोंडी मोठा घास’ ही उक्ती खरी ठरवत बाल-कुमारांनी दुष्काळ, पर्यावरण, अवकाळी पाऊस, स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या अशा महाराष्ट्रापुढील गंभीर विषयांवर कविता सादर करीत सभागृहाला विचारप्रवृत्त केले.
          शब्दधन जीवन गौरव काव्यमंचातर्फे आयोजित पहिल्या शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनात दुपारच्या सत्रात निमंत्रित बालकांचे कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण पवार, संमेलनाचे समन्वयक प्रा. संपत गर्जे, शब्दधन जीवन गौरव काव्यमंचाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सरोज पंडित, विजय अंधारे, बापू डिसोजा, पुनम पाटील, मीनाक्षी डफळ, अलका बोर्डे, विजय लोंढे, पांडुरंग पवार, सीमा गांधी, पुष्पा सदाकाळ, उत्कर्ष शिरसाट, अनुष्का गर्जे, विकास बोडके, सभा शेख, उत्कर्ष बुधवंत, आर्या शेवाळे, ऐश्वर्या कुलकर्णी, गणेश पाचारणे, आदिती वायाळ, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रमुख पितामह कोष्टी होते.
             साधना शेलार या बालकवयित्रीने सादर केलेली ‘मुलगी’ ही कविता रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. स्त्रीभ्रूण हत्या रोखा, जन्मापूर्वी मला गर्भातच मारू नका, असा या कवितेचा अन्वयार्थ होता. ईश्वरी गवळी हिने ‘आई वडिलांच्या अपेक्षा’ कविता सादर करत मुलगी वाचवा हा संदेश दिला. कृष्णा कांबळे या कवीने दमदार आवाजात सादर केलेली ‘पाऊस’ कविता अंगावर शहारे आणणारी होती. या कवितेने रसिकांच्या उत्स्फूर्त दाद घेतली. ‘पावसाने दिला शाप’ कविता सादर करीत पल्लवी सुपुत्रे हिने दुष्काळ, अवकाळी पावसामुळे शेती- घरेदारांचे झालेले प्रचंड नुकसानाने खचलेल्या मनाचा ठाव कवितेतून घेतला.
         ‘सकाळ झाली उठुया, रात्रीला बाय बाय करूया, स्वच्छ भारत करूया, रोगांना आपण घालवूया’, कविता सादर करून स्वच्छ भारतासाठी मूल्ये जपण्याचे आवाहन गौरव अनारसे या विद्यार्थ्याने आपल्या कवितेतून रसिकांना केले. पूर्वा वैभव सोनवणे या चार वर्षाच्या चिमुकलीने ‘आभाळातून पडले कमळाचे फुल’ कविता सादर करीत रसिकांची वाहवा मिळविली. टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या कवितेला उत्स्फूर्त दाद दिली. शिवांजली वणारसे हिने पाऊस कविता सादर केली.
       समीक्षा लहिरे या विद्यार्थिनीने ‘धर्म’ कविता सादर केली. तिने कवितेतून ‘आपण सर्व एकाच धर्माचे आहोत, त्यामुळे भेदाभेद विसरून सशक्त भारत घडवूया हा संदेश दिला. आरती जाधव हिने ‘गरज फक्त परिवर्तनाची’ कवितेतून कर्जमाफी, आत्महत्या करण्याच्या मनोवृत्तीतून बाहेर पडावे, समान हक्क मिळावेत, पर्यावरणाचा समतोल राखला जावा अशा अपेक्षा व्यक्त करीत रसिकांना विचारप्रवृत्त केले. वैशाली वाळके हिने पक्ष्यांची शाळा सादर करीत शाळेविषयी संकल्प केला. सार्थक हिंगणे याने मला सहलीला जायचंय कविता सादर केली. ऐश्वर्या कुलकर्णी हिने ‘निसर्गाचा नियम’ कविता सादर केली. यातून तिने वृक्षतोड, प्रदूषण याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कैलास गुंजाळने ‘देवाकडे मागणे’ सादर करीत रसिकांना बालपणाच्या आठवणींत नेऊन ठेवले. स्वानंद पारखी, गौरी शिंदे, भक्ती बुधवंत, प्रीती पठारे, गौरी कारके, स्तुती क्षेत्रे, दीपाली लोणारे यांनीही कविता सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
          तत्पूर्वी, सोमनाथ वाघ यांनी ‘खैरलांजी पुन्हा घडणार नाही’, हा नाट्याविष्कार सादर करीत रसिकांना विचारप्रवृत्त केले. कलीम तांबोळी यांनी कथाकथन सादर करीत संपूर्ण रसिकांना हास्यकल्लोळात घेऊन गेले. नाट्याविष्कार व कथाकथन या सत्राच्या अध्यक्षस्थानी नागेश शेवाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारू कडाळे, दीपक अमलिक, प्रा. अनिता सुळे उपस्थित होते.
          सूत्रसंचालन निरुमा भेंडे, सोमनाथ वाघ, वंदना इंनानी, मनिषा भोसले यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...