पिंपरी –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा क्रीडा विभागांतर्गत आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आज (दि.29 नोव्हेंबर) व उद्या (दि. 30 नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुणे जिल्हा क्रीडा विभागातील मुलींच्या गटात 15 महाविद्यालये, तर मुलांच्या गटात 30 महाविद्यालये सहभागी होत आहेत. या स्पर्धेत 90 खेळाडू विभागीय स्पर्धेत निवड होण्यासाठी प्रयत्न करतील. या सर्व स्पर्धा वजन गटानुसार होणार आहेत. मुलांच्या स्पर्धा आठ, तर मुलींच्या स्पर्धा 7 वजन गटात होणार आहेत.
या स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे असतील, तर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांच्या होईल. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सहसचिव डॉ. गौरी पाटील व ज्ञानेश्वर विमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंच म्हणून पुणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र यादव, श्री. शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर काम पाहतील.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. एस. के. मलघे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एस. आर. थरकुडे प्रयत्न करीत आहेत. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना संस्थेचे उपाध्यक्ष गोरख काळोखे, मुकुंदराव खळदे, खजिनदार केशवराव वाडेकर, सदस्य चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

