भारतभरात ५,००० इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी स्विच मोबिलिटी आणि चलो यांचा परस्पर सहयोग

Date:

चेन्नई, भारत – ११ ऑगस्ट २०२२: अत्याधुनिक कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहनांची कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड (‘स्विच’) आणि भारतातील आघाडीची वाहतूक तंत्रज्ञान कंपनी चलो यांनी भारतभरात ५,००० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी धोरणात्मक सहयोग करत असल्याचे आज जाहीर केले. तीन वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बसेस मेट्रो आणि इतर शहरांमध्ये तैनात केल्या जातील, ज्यामध्येसुरुवातीला स्विच EiV 12 प्रकारच्या गाड्या समाविष्ट आहेत.

स्विच मोबिलिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्विच मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य कामकाज अधिकारी महेश बाबू म्हणाले, “भारतातील बदलत्या दळणवळण रचनांमुळे लोकांच्या शहरांमध्ये प्रवास करण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल होत आहेत. स्वच्छ, शाश्वत इलेक्ट्रिक वाहतूक उपायांचा अवलंब करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला चालना देताना या क्षेत्रात अशा प्रकारची पहिली भागीदारी चलो सोबत  करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत इलेक्ट्रिक वाहन उत्पादनांसह चलोच्या मजबूत ग्राहक संपर्क आणि ऑपरेशनल कौशल्याचा फायदा घेऊन देशातील शहरी गतिशीलता बदलण्याचे आमचे ध्येय आहे. ५००० इलेक्ट्रिक बसेसची ही महत्त्वपूर्ण भागीदारी ग्राहकांचा एकूण अनुभव उंचावताना नक्कीच परवडणाऱ्या, आरामदायी, त्रासमुक्त आणि पर्यावरणास अनुकूल वाहतूक उपायांसाठी निश्चित प्रवेश खुला करेल.”

चलोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित दुबे म्हणाले, “भारताच्या दैनंदिन प्रवासात बसेसचा ४८% वाटा आहे आणि तरीही आपल्याकडे १०,००० लोकांसाठी फक्त ३ बस आहेत. बसचा ताफा वाढवणे आणि उच्च दर्जाच्या बसेस उपलब्ध करून देणे हे प्रत्येकासाठी प्रवास अधिक चांगला करण्याचा चलोचा उद्देश साध्य करण्यासाठीची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. गेल्या वर्षी आम्ही आमच्या तीन शहरांमध्ये १,००० नवीन बसची भर घालण्याचा प्रकल्प अंतिम केला. आज ५ पट मोठ्या प्रमाणावर स्विचसह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या बसमधील प्रवासाचा अनुभव हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या जागतिक शहरांमधील प्रवासाच्या तोडीचा असेल. आम्हाला विश्वास आहे की हा सहयोग शाश्वत शहरे निर्माण करण्याच्या दिशेने आमचा एकत्रित प्रवास पुढे सुरू ठेवेल.”

या भागीदारीअंतर्गत स्विच आणि चलो सध्या चलो कार्यरत असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी संयुक्तपणे गुंतवणूक करतील. चलो लाइव्ह बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकिटे आणि प्रवास योजना यांसारख्या सुविधा देणारे चलो अॅप आणि चलो कार्ड सारख्या ग्राहक तंत्रज्ञान उपायांचा वापर करेल; आणि मार्ग, वारंवारता, वेळापत्रक आणि भाडे देखील निर्धारित करेल. स्विचच्या जबाबदाऱ्यांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा आणि देखभाल यांचा समावेश आहे.

स्विच मोबिलिटी बद्दल

स्विच मोबिलिटी ही हरित दळणवळणाद्वारे जीवन समृद्ध करण्याचे ध्येय असलेली अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहनांची कंपनी आहे. एक परिपक्व स्टार्ट अप असलेल्या स्विच मध्ये जगातील चौथ्या क्रमांकाची बस OEM अशोक लेलँड आणि बस डिझाइनमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात शतकाहून अधिक अनुभव असलेल्या UK बस उत्पादक, Optare यांच्या नाविन्यपूर्ण EV घटकांमधून परिश्रमपूर्वक उत्पादन करण्यात आले. २०१४ मध्ये, स्विच (त्यावेळचे Optare) ने लंडनच्या रस्त्यांवर प्रथम ब्रिटीश निर्मित, शुद्ध इलेक्ट्रिक बसेस सादर केल्या आणि तेव्हापासून विकसित आणि विकसनशील बाजारपेठांमध्ये ३० दशलक्ष इलेक्ट्रिक मैल चालवून ३०० ईव्हीज मार्गांवर आणल्या आहेत.

यूके तील लीड्स आणि भारतातील चेन्नई येथे आमच्या साइट्सवर समर्पित टीम्ससह एक समूह म्हणून काम करताना आमची बाजारपेठेतील आघाडीची वाहने जगभरातील ४६ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात आणि अद्वितीय उत्पादने तयार करण्यासाठी ब्रिटिश आणि भारतीय डिझाइन, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा उत्तम मेळ घालतात. हलक्या वजनाच्या वाहन रचने मधील अनुभव, निव्वळ शून्य कार्बन तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, सॉफ्टवेअर आणि ग्राहक सेवा यामधील आमच्या प्रात्यक्षिक अनुभवाचा आणि सिद्ध कौशल्याचा फायदा घेत स्विच मोबिलिटीचे उद्दिष्ट उद्योगातील व्यावसायिक ईव्ही पुरवठादार आणि नियोक्ता बनण्याचे आहे. त्याच्या उपकंपनी OHM द्वारे, स्विच देखील eMaas सेवांची श्रेणी सादर करते, समुदायांना त्यांच्या शून्य उत्सर्जन वाहतूक नेटवर्कमध्ये संक्रमण करण्यास पाठबळ देते.

चलो बद्दल

चलो ही भारतातील आघाडीची वाहतूक तंत्रज्ञान कंपनी असून ती ४० शहरांमध्ये कार्यरत आहे. प्रत्येकासाठी प्रवास अधिक चांगला करण्याच्या 

मूळ उद्देशाने २०१४ मध्ये तिची स्थापना करण्यात आ ली. चलो अॅप १५००० हून अधिक बसचे थेट ट्रॅकिंग पुरविते आणि हे भारताचे #1 बस ट्रॅकिंग अॅप आहे. चलो कार्ड

, एक संपर्करहित टॅप-टू-पे ट्रॅव्हल कार्ड असून ते भारतातील सर्वात यशस्वी बस ट्रॅव्हल कार्ड आहे. हे बस कार्ड तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. चलो, चलो अॅप आणि चलो कार्डवर सुपर सेव्हर प्रवास योजना देखील सादर करते जे बस प्रवाशांना त्यांच्या बस प्रवासावर पैसे वाचविण्यात मदत करते.

चलो ने आपले तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म कार्यरत करण्यासाठी आणि बस प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी २५०० पेक्षा जास्त बस ऑपरेटर्ससोबत भागीदारी केली आहे. जुलै २०२२ मध्ये, चलोने त्याच्या प्लॅटफॉर्मवर १२० दशलक्ष राइड्स केल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...