पुणे : ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतले आहेत अशांसाठी पोहोण्याचे तलाव, सुरू करावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आढावा बैठक उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी झाली. बैठकीत सहभाग घेऊन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सूचना केल्या.
ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस झाले आहेत अशा माझ्या मागणीला बैठकीत मंजुरी मिळाली. त्याप्रमाणे सकाळच्या वेळी पार्क सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. खुली मैदाने सुरूच राहातील असे प्रशासनाने स्पष्ट करून याबाबतचा संभ्रम दूर केला, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.
ज्या नागरिकांचे आणि खेळाडूंचे कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस पूर्ण झाले आहेत अशांसाठी जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी आ. शिरोळे यांनी केली.
कोरोना नियंत्रणासाठी दि. २२ मे २०२० पासून ज्या बैठका सातत्याने झाल्या आणि सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, प्रशासन यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे एक डॉक्युमेंटेशन बनवावे, अशीही सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बैठकीत केली.

