पुणे-विद्यार्थी विकास विभाग ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्वररंग 2022 यावर्षी फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये होणार आहे या स्वररंग युवक महोत्सवामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे विभागातील जवळपास ६० पेक्षा अधिक महाविद्यालयाचा सहभाग असणार आहे या साठ महाविद्यालयातील हजाराहून अधिक विद्यार्थी विविध कला प्रकारांमध्ये आपली कला सादर करणार आहेत या कलाप्रकारांमध्ये लोक नृत्य ,लोक गायन ,समूहगीत ,समूह गायन कोलाज, मेहंदी ,रांगोळी ,लोकनाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनश्च आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे या स्वररंग 2022 या महोत्सवाची फर्ग्युसन महाविद्यालयात अतिशय उत्साहाने आयोजन चालू आहे या आयोजनामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभाग घेत आहेत. या युवक महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे .या स्वर रंग 2022 या उपक्रमाचे उद्घाटन ४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांच्या हस्ते होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी असतील व त्यानंतर विविध 10 व्यासपीठांवर या स्पर्धा चालू होतील या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुशीलकुमार धनमने व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. मयुर क्षीरसागर काम बघत आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे
फर्ग्युसन महाविद्यालयात स्वररंग 2022
Date:

