Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘स्वरस्वती’ सांगीतिक मैफलीत झाली ‘स्वर रंगांची’ उधळण

Date:

पुणे :  सत्यम शिवम सुंदरम… मेरे नैना सावन भादो…. ये दिल और उनकी निगाहों… अपलम चपलम… मै जिंदगी का साथ… ये आंखे देखकर… ओ मेरे शाहे खुबा… वो भुली दासता… कुछ दिलने कहा… सूर येती विरून जाती… अशा सुवर्णकाळातील अजरामर गीतांची स्वर मैफल रंगली. धुलीवंदनाच्या निमित्ताने दिवसभर रंगात न्हाऊन निघालेल्या पुणेकरांच्या आनंदात रात्री या स्वर मैफलीने सप्तरंग भरले. खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची मंचावरील उपस्थिती आणि त्यांच्या शब्दात गाण्यांच्या निर्मिती, सादरीकरणातील लतादीदींच्या आठवणींनी श्रोत्यांना सुखद अनुभूती दिली. 
निमित्त होते, ‘महक’ प्रस्तुत सुवर्णकाळातील अजरामर गीतांच्या ‘स्वरस्वती’ मैफलीचे! प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल्स महक निर्मित व प्रस्तुत, गेट सेट गो आयोजित ‘स्वरस्वती’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रमातून कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्वर रंगांची उधळण झाली. ओ सजना, चंदन सा बदन, मै एक सदी से, पिया तोसे नैना, सावन का महिना अशी बहारदार आणि अजरामर गीते सादर झाली. अनेक गाण्यांनंतर श्रोत्यांनी ‘वन्स मोअर’ची मागणी करत कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला.
गायिका डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल आणि जितेंद्र अभ्यंकर यांच्या बहारदार गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनय गाडगीळ, मिहीर भडकमकर, बाबा खान, केदार मोरे, प्रसाद गोंदकर, समीर सप्रे, विशाल थेलकर, निलेश देशपांडे अपूर्व द्रविड, ऋतुराज कोरे यांचे बहारदार वादन झाले. मिलिंद कुलकर्णी यांनी ओघवते निवेदन केले. आदरणीय पंडितजींसमोर सहभागी गायक-वादक कलाकारांनी ‘स्वरस्वती’ कार्यक्रमात ज्यापद्धतीने आणि ताकदीने सर्वच रचना सादर केल्यात, त्या म्हणजे खरेतर प्रत्यक्ष दैवी आशीर्वाद आहेत, असेच वाटले. अप्रतिम सादरीकरण ज्या मूडमध्ये कार्यक्रम सुरू होता ते ऐकतांना अंगावर शहारे येतात.
लतादीदींच्या आठवणींना उजाळा देताना पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “लतादिदी हिरकणी होती. सरस्वती, महालक्ष्मीचे रूप होती. तिच्या जाण्याने संगीतपर्व संपले असले, तरी आता संगीताचे एक नवे युग सुरु झाले आहे. आज तिची गाणी अनेक गायक गातात. वादक वाजवतात. अनेक कलाकारांच्या डोक्यावर तिचा मायेचा हात, आशीर्वाद आहे. मूळ आवाज आज नक्कीच देहरुपाने नाही. पण ज्या रचना दीदींनी गाऊन अजरामर केल्या, त्या आजही ऐकतांना छान वाटते. दिदी नावाचे पर्व संपले, पण लता मंगेशकर या नावाने जागतिक पटलावर जी कारकीर्द घडवली ती रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहणार आहे. दीदीचे कर्तृत्व महान आहे. आपल्या वडिलांची आठवण जपण्यासाठी तिने हॉटेल, सिनेमा किंवा नाट्यगृह उभारले नाही, तर आशियातील सर्वात मोठे असे ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ पुण्यात उभारले. आपल्या सर्वांसाठीच तिच्या या आठवणी कायम मनात साठवून ठेवण्याजोग्या आहेत.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...