घरगुती वीजदरामध्ये वाढीच्या विरोधात स्वराज्य निर्माण सेनेचे “ धरणे आंदोलन ”

Date:

पुणे-घरगुती वीज बिल युनिटच्या दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीच्या विरोधात स्वराज्य निर्माण सेनेच्यावतीने रास्ता पेठमधील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर “ धरणे  आंदोलन “ करण्यात आले . महाराष्ट्रामध्ये युनिटच्या  दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे . १०० युनिटला तीन रुपये तसेच पुढील १०० ते ३०० युनिटला ६ रुपये ७३ पैसे , ५००ते १००० युनिटला ११ रुपये व त्यापुढील युनिटला १२ रुपये ४८ पैसे इंधन भार इतर भार , वाहन भार डिपॉसिट असे मिळून एक मोठी रक्कम गोर गरिबांच्या खिशातून उकळण्याचे काम आपली महावितरण व महाराष्ट्र सरकार करीत आहे . या दरवाढीला स्वराज्य निर्माण सेनेचा तीव्र विरोध आहे . असे स्वराज्य निर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नूभाई कागडा यांनी सांगितलॆ .

यावेळी  स्वराज्य निर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नूभाई कागडा यांनी मागणी केली कि , घरगुती लाईट बिल प्रति युनिट तीन रुपये आकारले जातात आहे तेच दोन रुपये किंवा तीन रुपये कायमस्वरूपी करण्यात यावे जर एखाद्यानी २०० , ३०० , ४०० , ५०० , १००० पर्यंत घरामध्ये वापर केला तर त्याला तीन रुपये प्रमाणे प्रति युनिट बिल देण्यात यावे दरमहा इतर भार , इंधन भार , वाहन भार , डिपॉझिट व अन्य भर जे मागितले जातात ते कुठेतरी रोखले पाहिजेत . अशी मागणी करण्यात आली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारापूर्वी पुण्याच्या Golden King ला मागितली होती 5 कोटीची खंडणी

शेट्टी गोळीबार ;सर्व आरोपी पुण्याचे रहिवासी, कुणी विद्यार्थी, तर...