स्वराज ब्रँडवर ग्राहकांचा विश्वास आणि हितधारकांप्रती ब्रँडची वचनबद्धता यामुळे अधोरेखित झाली आहे.
मोहाली, ७ सप्टेंबर २०२२: भारतातील ट्रॅक्टर उद्योगातील एक आघाडीचा ब्रँड आणि महिंद्रा समूहाचा एक भाग स्वराज ट्रॅक्टर्सने आपला २० लाखावा ट्रॅक्टर मंगळवारी पंजाबमधील मोहाली येथील आपल्या प्लॅन्टमध्ये तयार करून बाहेर पाठवल्याची घोषणा केली आहे. स्वराज ट्रॅक्टर्सने आपल्या वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा पार करून स्वराज ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास व ग्राहकांच्या मागण्या, गरजा पूर्ण करण्याचा ब्रँडचा आत्मविश्वास अढळ असल्याचे पुन्हा एकदा दर्शवले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे स्वराज डिव्हिजनचे सीईओ श्री. हरीश चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका विशेष समारंभात स्वराज ब्रँडचा २० लाखावा ट्रॅक्टर प्रस्तुत केला. या प्रसंगी ते म्हणाले, “विश्वसनीय आणि गेल्या काही वर्षात देशांतर्गत ट्रॅक्टर बाजारपेठेत सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला एक ब्रँड ही स्वराजची ओळख या यशामुळे अधिक दृढ झाली आहे. ब्रँडच्या आजवरच्या वाढीमध्ये आमच्या ग्राहकांनी व सर्व हितधारकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
स्वराज ब्रँडचा शुभारंभ १९७४ साली झाला आणि २०१३ साली १० लाखावा ट्रॅक्टर तयार करण्याचा टप्पा त्यांनी पार केला. त्यानंतर अवघ्या ९ वर्षात २०२२ मध्ये त्यांनी २० लाख ट्रॅक्टर निर्मितीचा लक्षणीय टप्पा गाठला आहे. स्वराज ब्रँडची वाढ जास्तीत जास्त वेगाने होत असल्याचे हे द्योतक आहे. गेल्या काही वर्षात महामारीमुळे या उद्योगक्षेत्राला अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागले आणि तरी देखील त्यांनी हे यश संपादन केले ही नक्कीच विशेष उल्लेखनीय बाब आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे प्रेसिडेंट श्री. हेमंत सिक्का म्हणाले, “२० लाख ट्रॅक्टर उत्पादनाच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आमच्यासाठी आव्हानात्मक आणि तितकाच रोचक होता. आम्हाला आनंद वाटतो की, आपल्या सुरुवातीपासून आजपर्यंत स्वराज ब्रँड भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात लक्षणीय योगदान प्रदान करू शकला. भविष्यात आम्ही त्यांना अधिकाधिक कृषी-आधारित उत्पादने उपलब्ध करवून देऊ व शेतीच्या यांत्रिकीकरणाला सक्षम बनवू. शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणून जीवन समृद्ध बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल यादृष्टीने आम्ही या यशाकडे पाहतो आहोत.”
स्वराज ब्रँड १५ एचपी ते ६५ एचपी रेन्जमधील ट्रॅक्टर तयार करतो व संपूर्ण यांत्रिकीकरणाच्या सुविधा उपलब्ध करवून देतो. कोड बाय स्वराज हे बहुउपयोगी शेती यंत्र नुकतेच सादर करून या आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडने फलोत्पादन यांत्रिकीकरणात देखील पुढाकार घेतला आहे. सध्या स्वराजकडे दोन संपूर्णतः चालू असलेले ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरींग प्लांट्स आहेत, त्यांचे स्वतःचे फौंडरी व आरअँडडी पंजाबमध्ये असून अजून एक नवा मॅन्युफॅक्चरींग प्लांट देखील याच राज्यात उभारला जात आहे.