स्वप्नील-रुचा चा रोमान्स दाखवणारे ‘ये आता’ गाणे प्रदर्शित

Date:

मराठी चित्रपटसृष्टीचा रोमँटिक हिरो स्वप्नील जोशीचा सिनेमा म्हंटल्यावर त्यात एखादे प्रेमगीत हे असायलाच हवे !  स्वप्नील आणि रोमान्स हे सूत्र आगामी ‘भिकारी’ सिनेमातील ‘ये आता’ या गाण्यातही आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मराठा एंटरटेनमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमातील ‘ये आता’ हे रॉमेंटिक गाणे सध्या खूप गाजत आहे. नवोदित अभिनेत्री रुचा इनामदार आणि स्वप्नील जोशीवर आधारित असलेल्या या गाण्यातील दृश्य पाहणाऱ्यांची डोळे दिपवून टाकत आहे.
‘स्वामी तिन्ही जगाचा…भिकारी’ या सिनेमाच्या प्रत्येक गाण्यात दिग्दर्शक गणेश आचार्य यांचा स्पेशल टच दिसून येत असल्यामुळे, ‘ये आता’ हे प्रेमगीतदेखील त्याला अपवाद नाही. छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालेल्या या गाण्यातील दृश्य लंडन येथे चित्रित करण्यात आली असून, यात स्वप्नील आणि रुचाची एक वेगळीच कॅमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळत आहे.
गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले असून, स्वप्नीलचे बोल खुद्द विशाल मिश्रा यांनीच गायले आहेत. तसेच हिंदीची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने रुचाचे बोल गात, हे गाणे अधिकच सुमधुर केले आहे. आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  यात स्वप्नील जोशी आणि रुचा इनामदार या जोडीसोबतच कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांचीदेखील विशेष भूमिका असणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इराणवर हल्ला करण्यास आमची मदत मिळणार नाही:स्पेनने USची 15 विमानं पिटाळून लावली

माद्रिद:स्पेन आपल्या सैन्य तळांचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी होऊ...

पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – ना. चंद्रकांतदादा पाटील.

रोलबॉल स्टेडियम आच्छादित करण्याच्या कामाचे भूमिपूजन व खेळाडूंचा सत्कार...

जातीयवादाच्या भस्मासुराच्या होळीत ट्रम्प च्या चित्राचीही पुण्यात होळी

पुणे : वंदे मातरम् संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटीच्या...