पुणे – पुणे महानगरपालिकेच्या गाडीखाना रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विजयानंद त्र्यंबक तांदळे वय 56 असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सांगितले कि,’, शिवाजी रोडवरील महापालिकेच्या गाडीखाना रुग्णलयामधील पहिल्या मजल्यावर असलेल्या एका विभागात विजयानंद त्रिंबक तांदळे हे काम करीत होते.ते आज नेहमीप्रमाणे कामावर आले होते. त्यांनी ऑफिसच्या छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याची माहिती आम्हाला पावणे अकराच्या सुमारास मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले त्याच दरम्यान डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी विजयानंद यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती सापडली असून त्यामध्ये मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. आता त्याआधारे तपास सुरू असल्याचे खडक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
महापालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Date:

