सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, उपनेते पदी निवड

Date:

मुंबई – माझ्यामागे इडी नाही, माझी पाटी कोरी आहे, भाजपला तोंड देण्यासाठी शिवसैनेत प्रवेश करीत आहे असे म्हणत आंबेडकरी चळवळीचे अभ्यासिका सुषमा अंधारे यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. पक्षात प्रवेश करताच त्यांची उपनेतेपदी वर्णीही लागली हे विशेष:

अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा- ठाकरे

”आमचा वारसा प्रबोधनकारांचा आहे, बाळासाहेबही सांगायचे की, घंटा बडवणारा हिंदु नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा.” अशी प्रतिक्रीया सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

मी शिवसेनेला काय देऊ शकते

याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसेनेत प्रवेश करुन मला काय मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काय द्याचे आणि काय घ्यायचे हा मुद्दा नसून मला शिवसेनेकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही. सद्यस्थितीत माझ्या डाेक्यात एकच गाेष्ट आहे, मी शिवसेनेला काय देऊ शकते. सैरभैर झालेल्या शिवसैनिकात एक नवीन उमेद जागविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे भंपक वादात नाही

पुढे त्या म्हणाल्या, भाजपचे हिंदुत्व हे अभिनेत्री कंगना, केतकी चितळे, नुपुर शर्मा, तुषार भाेसले यांच्यासारख्यांच्या प्रवृत्तीचे आहे. हे चिथावणी देणारे, भडकाऊ, भाेंगे उतरवणारे, भाेंग्यावरुन सुपारी देणारे असे हिंदुत्व आहे. या गोष्टीचा आनंद आहे की, अशा भंपक वादात उद्धव ठाकरे नसून ते प्रबाेधनकार ठाकरे यांचा वारसा चालवणारे आहेत.

माझी पाटी कोरी

त्या म्हणाल्या, शिवसेनेतून जे लाेक बाहेर पडतात त्यांच्या डाेक्यावर फाईलींचे ओझे असून ईडी, सीबीआय, आयटी यांच्या टांगत्या तलवारी आहेत. माझ्या काेणत्याही चाैकशी सुरु नसून माझी पाटी काेरी आहे. महाविकास आघाडीत माझ्यावर अन्याय झालेला नाही. परंतु महाराष्ट्राची मान ताठ ठेवण्यासाठी आणि भाजपला ताेंड देण्याकरिता मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. माझे समविचारी लाेक माझ्यासाेबत शिवसेनेत प्रवेश करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...