कंपनीच्या संचालकांच्या शिफारस पत्राद्वारे होणार निवड
पुणे.- दरवर्षीप्रमाणे यंदाही सुर्यदत्ता इन्स्टीट्युट तर्फे गरजू कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती लहान, मध्यम व मोठ्या कंपनीमधील जे कर्मचारी निष्ठावंत आहेत व ज्यांना आर्थिक
अडचणीमुळे किंवा वैयक्तिक कारणामुळे उच्चशिक्षण घेता आले नाही अशा गरजू कर्मचाऱ्यांना देण्यात येते. अशी माहिती सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे संस्थापक संचालक संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशनचे, संयुक्त संचालक चंद्रकांत निनाळे, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे संस्थापक संचालक संजय चोरडिया,उपनिबंधक नूतन गवळी, सुर्यदत्ता इन्स्टीट्युट ऑफ मैनेजमेंट अॅन्ड इन्फॉमेशन रिसर्चचे संचालक शांतीलाल हजेरी, सुर्यदत्ता इन्स्टीट्युट
ऑफ व्होकेशनल अॅन्ड अॅडव्हान्स स्टडीजचे संचालक शैलेश कुलकर्णी,तसेच ही शिष्यवृत्ती घेऊन उर्तीण झालेले माजी कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.सोनम देशपांडे आणि पायल माणिक झंवर यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली .

