पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’साठी नुकताच अभिमानाचा आणखी एक क्षण उजाडला. या समूहातील ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (पुणे)’ या संस्थेला तिने बजावलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल ‘द रायझिंग लीडरशिप ॲवॉर्ड फॉर द बेस्ट इंटेरियर अँड फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा ‘रायझिंग लीडरशिप ॲवॉर्ड्स’ पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा नुकताच गोव्यात झाला. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर ही या समारंभातील प्रमुख व सन्माननीय पाहुणी होती. तिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रमाणपत्र व मानचिन्ह देण्यात आले. विजेत्यांमध्ये भारतभरातील व्यवसाय क्षेत्रे व सेवा क्षेत्रांचा समावेश होता.
यासंदर्भात ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आमच्या कामगिरीसाठी गौरवले जाणे, हा आमच्या संस्थेसाठी खरोखर मोठा सन्मान आहे. ‘सूर्यदत्ता ग्रुप’मध्ये आम्ही नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कल्याणकारी विकास मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो.” ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’ फॅशन डिझाईन, फॅशन ॲडमिनीस्ट्रेशन आदी क्षेत्रांत युजीसी मान्यताप्राप्त डिप्लोमा, डिग्री व मास्टर्स डिग्री अभ्यासक्रम देते.
‘द रायझिंग लीडरशिप ॲवॉर्ड्स’ हे पुरस्कार ‘एपीएस रिसर्च अँड मीडिया’ कंपनीतर्फे घेतल्या गेलेल्या व्यापक बाजार संशोधन अभ्यासावर, तसेच जनमत सर्वेक्षणांवर आधारित होते. ही मल्टी–प्लॅटफॉर्म कंपनी माध्यम व संशोधन सेवांत कुशल अनुभवी आहे. समाज उभारणीत महान योगदान देणाऱ्या भारताच्या सर्वोत्तम व्यवसाय व सेवा नेत्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने हे पुरस्कार दिले जातात आणि त्यातून विजेत्यांतील सर्वोत्कृष्टतेला गौरव, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते.