उजवीकडून डावीकडे
१. पूनम जैन व्यवस्थापक टायटो, प्रसाद देवरे (नासकॉम संचालक), संजीब पतजोशी(आयपीएस, अतिरिक्त महासंचालक), डॉ. शंकर राममूर्ती(संचालक अॅमडॉक्स), इन्फोसिसचे सहायक उपाध्यक्ष रजनीश मालवीय,अनंत तरीरवश, केपजेमिनीचे उपाध्यक्ष शैलेंद्र झा, सुनील आव्हाड संचालक अ कॅप जेमिनी कंपनी(IGATE),संजय उपाध्यक्ष (वरिष्ठ व्यवस्थापक अॅमडॉस)
उभ्या रांगेत सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया समवेत आदी मान्यवर
उल्लेखनीय कामगिरी करणारया १९ जणांचा सन्मान; परिषदेचेही आयोजन
पुणे :- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक आणि प्रात्यक्षिक ज्ञानातील दरी कमी करण्याच्या प्रमुख हेतूने सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक असोसिएशनतर्फे राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. यावेळी ‘माहिती तंत्रज्ञान उत्कृष्टता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूट,बावधन येथे हा कार्यक्रम पार पडला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने बदलणारया तंत्रज्ञानाचा आणि माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यास करण्याच्या प्रमुख उद्देशाने ही परिषद भरविण्यात आली होती. यात ४०० विद्यार्थी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे ५० अभियंते आणि ५० शिक्षक सहभागी झाले होते. यावेळीउपस्थित असलेल्या न्यासकॉमचे अध्यक्ष प्रसाद देवरे, इन्फोसिसचे सहाय्यक उपाध्यक्ष रजनीश मालवीय, कॅप जेमिनीचे उपाध्यक्ष शैलेश झा, आयपीएस अधिकारी संजीव कुमार पतजोशी आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूट चे संस्थापक –संचालक संजय चोरडियातसेच भारतीय दहशतवाद विरोधी संघटनेचे संचालक मनिंदरसिंग बिट्टाही यावेळी उपस्थित होते.
चोरडिया म्हणाले, “आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपनीत संवाद होणे गरजेचे असून भविष्यकाळात हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायद्येशीर ठरणारे असेल. हे लक्षात घेऊन, आम्ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची सुरुवात देखील केली आहे. या क्षेत्रात संशोधन हा अत्यंत महत्वाचा विभाग असून यामध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे. स्पर्धेच्या युगात अनोख्या व नावीण्यपूर्ण शोधास यशाच्या अनेक वाटा खुल्या असतील.”
देश सक्षम व सुरक्षित होण्याकरिता युवकांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत देशाची सुरक्षा ही युवा पिढीची जबाबदारी असे बिट्टा यांनी आपल्या राष्ट्रभक्तीपर भाषणात नमूद केले. तसेच वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.