दिल्ली-
विद्यार्थ्याना उच्च शिक्षण देण्यामागे उत्तम माणुस व आदर्श नागरिक तसेच जागरुक समाज बनविणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.शिक्षणाचा हेतू आणि गेली अनेक वर्षे त्या मध्ये झालेले सकारात्मक बदल या विषयावर प्रसिध्द कलावंत शेखर सुमन यांनी आपले मत मांडले. नुकत्यात दिल्ली येथै झालेल्या एका समारंभात जागरण डॉट कॉम आणि कन्टार टी एन स या जागतिक संशोधन संस्थेने पुण्यातील सुर्यदत्त इन्स्टीट्यूट ऍाफ मॅनेजमेंटला पश्चिम भारतातील उत्तम बी स्कूल्सच्या यादीमध्ये पहिल्या चार मध्ये स्थान मिळाल्याबद्दल प्रसिध्द अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक शेखर सुमन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार जागरण जोसचे कार्यकारी संचालक भरत गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह या स्वरुपात देण्यात आला. हा पुरस्कार सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.संजय चोरडिया यांनी स्विकारला.
हा पुरस्कार स्विकारल्यावर डॉ.संजय चोरडीया म्हणाले सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट ही नेहमीच दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासावर भर देऊन शिक्षण देणारी पध्दती अमलात आणत असते. आता जगभरात व्यवस्थापन हे शिक्षणप्रवाह आणि प्रशिक्षण हे उत्तेजन देणारे मोजमाप म्हणून मानले जाते.सुर्यदत्त ग्रुप ही चांगली उदयास आलेली व नावाजलेला उत्तम ब्रॅन्ड ,दर्जेदार व्यवस्थापन शिक्षण देणारी व औद्योगिक नेतृत्व असलेली शैक्षणिक संस्था आहे. नवकल्पना असलेले अभ्यासक्रम,सामाजिक ,भौगोालिक व बहुभाषिय हायब्रीड ग्रुपचे फायदे देऊन महत्वाकांक्षी व आकाशात उंच भरारी घ्यावयाची आहे अशा विद्यार्थ्यांना कॅार्पोरेट जगताकडे चढाई करण्यास प्रोत्साहित करणारी आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी माफक दरात दर्जेदार शिक्षण देणे व स्वयम सारख्या सरकारने सुरु केलेल्या आधुनि कतंत्रज्ञानाचे महत्व या विषयी माहिती डॉ.सजय चारेडीया यांनी दिली.सुषमा चोरडीया यांनी सुर्यदत्तला प्राप्त झालेल्या उत्तम श्रेणीबद्दल सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.

