पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा देणारे विद्यार्थी जोमाने तयारीला लागले आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन वर्ग, क्लासेस, चाचण्या, सबमिशन्स याचा ताण विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांवरही येतो. गेल्या वर्षभरात लिखाणाची सवय थोडी मागे पडली असली तरी, बोर्डाच्या परीक्षेत लिखाणाला पर्याय नाही. हे सगळे तणावमुक्त वातावरणात व्हावे, यासाठी ‘सुपरमाईंड’ सरावाची गरज आहे. त्यासाठी सुपरमाईंड फाउंडेशन संस्थेतर्फे ‘आयएमपी’ टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याबाबत बोलताना समुपदेशिका आणि फाउंडेशनच्या संचालिका मंजुषा वैद्य म्हणाल्या, “जानेवारी-फेब्रुवारी आला की, वेध लागतात ते परीक्षेचे. त्यात दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा असेल तर विद्यार्थी-पालक अधिक गंभीर होतात. वर्षभराचा अभ्यास एखाद्या महिन्यात उरकण्याची गडबड सुरु होते. यावर्षी वातावरण जरा वेगळे आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक याबरोबच शैक्षणिक नियोजनही कोलमडले आहे. मुले ऑनलाईन शाळेत शिकू लागली. टेक्नॉलॉजीचा वापर करू लागली. लॅपटॉप, टॅब, मोबाईलसारखी उपकरणे त्यांच्या शिक्षणातील अविभाज्य घटक बनली. तरीही आठ-नऊ महिन्यांपासून वही, पेन, पुस्तके, पेन्सिल यापासून मुले थोडी दूर गेली आहेत.”
“काळाप्रमाणे बदलणे आवश्यक असले तरी अध्ययन पद्धतीत झालेला बदल तात्पुरता असून, परीक्षापद्धती नेहमीप्रमाणेच लिखाणरूपी आहे, याचे भान हवे. डिजिटल उपकरणे वापरताना असणारा बोटांचा वेग व त्याच बोटांमध्ये पेनाने लिहिण्याच्या वेग यात फरक आहे. परीक्षेमध्ये येत होते पण लिहायला वेळच पुरला नाही, असे होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, हे लक्षात घेऊन लिखाणरूपी अभ्यास, लिखाणाचा सराव करावा. यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे दहावीचा २५% अभ्यासक्रम कमी झाला आहे. कोणत्या विषयाचा अभ्यास कमी झाला? परीक्षेची तयारी कशी करावी? लिखाणरूपी सराव कसा करावा? याविषयी फाउंडेशनच्या समुपदेशिका मार्गदर्शनासाठी तत्पर आहेत. ‘सुपरमाइंड’ची आयएमपी टेस्ट सिरीज दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता उपयुक होईल. सर्व विषयांच्या बोर्ड पॅटर्नप्रमाणे कृतिपत्रिका (दहावीकरीता २५% कमी केलेल्या अभ्यासक्रमानुसार) तज्ज्ञ शिक्षकांकडून सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करून दिली जाणार आहे. शिवाय सर्व विषयांच्या आदर्श उत्तरपत्रिका दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९०४९९९२८०७ किंवा ९०४९९९२८०९ यावर संपर्क साधावा,” असे आवाहनही मंजुषा वैद्य यांनी केले आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा ‘सुपरमाईंड’ सराव
Date:

