महालक्ष्मी दर्शन सहलीचा 175 महिलांनी घेतला लाभ
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग) पुणे शहर च्या वतीने प्रभाग क्र. 35 (दीनानाथ मंगेशकर रूग्णालय) मधील महिलांना मोफत कोल्हापूर येथील महालक्ष्मी दर्शन या सहलीचे आयोजन केले होते. या उपक्रमातंर्गत सहलीच्या पहिला टप्प्यात महिला दिनानिमित्त 175 महिलांना सहलीला नेण्यात आले होते. सहल आयोजक चैतन्य उर्फ सनी मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग पुणे शहर अध्यक्ष) यांनी सांगितले.
उपक्रमातंर्गत 2000 हजार महिलांना मोफत दर्शन सहलीला नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे तसेच पुढे अजून चांगले सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक चैतन्य उर्फ सनी मानकर यांनी दिली.