बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. तेलगू तामिळ मल्याळम आणि कन्नड दर्शकाना अदा दाखवल्यानंतर सनी मराठीमध्ये दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती. लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. या मराठी आयटम साँग ची जोरदार चर्चा रंगू लागली असून आधुनिक ‘शांताबाई’चा अवतार पाहायला अनेकजण उत्सुक असल्याचा दावा करण्यात येतोय .
शांताबाई या गाण्याला आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ करोड हुन जास्त व्ह्यूज असून महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे.कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. ‘शांताबाई’ या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या ‘सनी लिओनी’ची दिलखेच अदांनी नटणार आहे. सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर ‘आमदार निवास’ भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.असा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा दावा आहे .
“आमदार निवास” मध्ये सनी लियोनी.
Date:

