पुणे, 26 मार्च 2021: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत मुलांच्या गटात अवनीश चाफळे, नीव कोठारी, अर्जुन किर्तने, विश्वजीत सणस यांनी, तर मुलींच्या गटात उर्वी काटे, निशिता देसाई, रितिका मोरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित नीव कोठारीने आपली विजयी घौडदौड कायमठेवत पाचव्या मानांकित अथर्व जोशीचा 6-0 असा सहज पराभव केला. तिसऱ्या मानांकित अवनीश चाफळेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या देवदत्त कुमारचा 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित अर्जुन किर्तने याने चिराग चौधरीचा 6-2 असा तर, चौथ्या मानांकित विश्वजीत सणसने शिवम पांडियाचा 6-4 असा पराभव केला.
मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित उर्वी काटेने श्रीया होनकनचे आव्हान 6-0 असे मोडीत काढले. निशिता देसाई व रितिका मोरे यांनी अनुक्रमे रिशीता पाटील व स्नेहा गजभर यांचा 6-2 अशा सारख्याच फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
नीव कोठारी(1) वि.वि.अथर्व जोशी(5)6-0;
अवनीश चाफळे(3) वि.वि. देवदत्त कुमार 6-4;
विश्वजीत सणस(4) वि.वि.शिवम पांडिया 6-4;
अर्जुन किर्तने(2) वि.वि. चिराग चौधरी 6-2;
मुली: उपांत्यपूर्व फेरी:
उर्वी काटे(1) वि.वि.श्रीया होनकन 6-0;
निशिता देसाई वि.वि.रिशीता पाटील 6-2;
रितिका मोरे वि.वि.स्नेहा गजभर 6-2
देवांशी प्रभुदेसाई(2) पुढे चाल वि. श्रावणी देशमुख

