भारताच्या ऋतुजा भोसले व ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथ यांना विजेतेपद

Date:

पुणे, 14मार्च 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत दुहेरीत भारताच्या ऋतूजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथच्या साथीत भारताच्या रिया भाटिया व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु या जोडीचा 6-2, 7-5 असा पराभव संपादन केले. 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीचा सामना 1तास 19मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये  अव्वल मानांकित ऋतूजा व  इमेली यांनी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भाटिया व बुलगारु यांची सहाव्या गेममध्ये गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व  हा सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ऋतूजा व  इमेली यांनी भाटिया व बुलगारु यांची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. तर, पुढच्याच गेममध्ये भाटिया व बुलगारु यांनी  ऋतूजा व  इमेलीची सर्व्हिस ब्रेक केली. सामन्यात 5-5 अशी स्थिती असताना अकराव्या गेममध्ये ऋतूजा व  इमेली यांनी भाटिया व बुलगारु यांची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 असा जिंकून विजेतेपद पटकावले. गतवर्षी फेब्रुवारी  2020मध्ये ऋतुजा भोसले व इमेली वेबली-स्मिथ या जोडीने जोधपूर येथे यासारख्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. या विजेतेपदाबरोबरच ऋतुजाने दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल 200 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.   
स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्या जोडीला 1437डॉलर(1,05,000रुपये) व 50डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या जोडीला 719डॉलर(52000रुपये) व 30 डब्लूटीए गुण देण्यात आले.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि एमएसएलटीएचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, एमएसएलटीएचे मानद सचिव  सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर मान्यवर उपस्थित होते.   दुहेरी गट: अंतिम फेरी:ऋतुजा भोसले(भारत)/इमिली वेबली स्मिथ(ग्रेट ब्रिटन)(1)वि.वि.रिया भाटिया(भारत)/मिरीयम बियांका बुलगारु(रोमानिया)(2) 6-2, 7-5.2 Attachments

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...