ज्युनिअर फ्रेंच ओपन 2020(रोलँगॅरोस)स्पर्धेत पुण्याची वैष्णवी आडकर भारताचे प्रतिनिधित्व करणार

Date:

पॅरिस येथे रंगणार रोलँगॅरोस वाईल्डकार्ड स्पर्धा
पुणे, 18 सप्टेंबर: ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळणे हे जगातील प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. पुण्याच्या वैष्णवी आडकरसाठी येत्या 2ऑक्टोबरपासून पॅरिस येथे रंगणाऱ्या ज्युनिअर फ्रेंच ओपन 2020(रोलँगॅरोस)वाईल्ड कार्ड स्पर्धेत खेळणे ही अशीच एक स्वप्नपूर्ती असेल. ही स्पर्धा पॅरिस येथे येत्या 2 ऑक्टोबर पासून रंगणार आहे
वयाच्या सहाव्या वर्षी टेनिसमध्ये पाऊल ठेवणाऱ्या वैष्णवी आडकर हिने स्थानिक पातळीवर तसेच, राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपली प्रगती कायम राखली. यंदा होणाऱ्या फ्रेंच ओपन ज्युनिअर वाईल्ड कार्ड स्पर्धेसाठी तिची निवड होणे हा योगायोग नव्हता. दिल्लीत झालेल्या रोलँगॅरोस ज्युनिअर 2020(18 वर्षाखालील) स्पर्धेत विजेतेपद पटकावून तिने हा मान मिळविला. या स्पर्धेतील विजयामुळे फ्रेंच ओपन ज्युनियर मुख्य ड्रॉ स्पर्धेत तिचे स्थान निश्चित होईल. 
कोरोना महामारीमुळे टेनिसच्या संपुर्ण मौसमावरपरिणाम झाला असताना फ्रेंच ओपन स्पर्धेसाठीचे आयोजन आणि त्यासाठी आपली निवड होणे ही केवळ 16 वर्षीय वैष्णवी साठी सुवर्णसंधीच ठरली आहे. वैष्णवी आडकर ही अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम हायस्कूलची विद्यर्थिनी असून बाऊन्स टेनिस अकादमीत पुण्यातील गुणवान प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 
आज पार पडलेल्या एक विशेष कार्यक्रमात बाऊन्स टेनिस अकादमी आणि अखिल भारतीय टेनिस संघटनेचे नवनिर्वाचित सहसचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते वैष्णवी आडकरचा खास गौरव करण्यात आला.   

यावेळी बोलताना 16 वर्षाखालील गटातील भारताची अव्व्ल क्रमांकाची टेनिसपटू आणि आयटीएफ क्रमवारीत सध्या 675स्थानावर असलेल्या वैष्णवी आडकर हिने सांगितले की, रोलँगॅरोस स्पर्धेतील टेनिस कोर्टवर खेळण्यास मी उत्सुक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे बालपणापासून बाळगलेले एक स्वप्न आता पूर्ण होत आहे. तसेच, खेळाबरोबरच तंदरुस्तीकडे खास लक्ष देत असल्याचे सांगून ती म्हणाली की, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी तंदरुस्तीला पर्याय नाही.
आपल्या टेनिस खेळात झालेल्या प्रगतीबद्दल वैष्णवी हिने आपले प्रशिक्षक केदार शहा यांचे आभार व्यक्त करताना ती म्हणाली की, माझ्या चुका आणि कच्चे दुवे काढून टाकणे आणि माझ्या बलस्थानांवर लक्ष्य केंद्रित करणे यासाठी केदार शहा सर मला नेहमीच मदत करतात. प्रत्यक्ष सामन्यात विजय मिळविण्यासाठी त्यांचा मला उपयोग होतो.   
माझ्या अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम हायस्कूल या शाळेने सैदव मला प्रोत्साहन व पाठिंबा दिला आहे. यामुळे अभ्यास आणि खेळ यांचा योग्य समन्वय साधण्यास मला फार मदत झाली. तसेच, माझ्या या वाटचालीत माझे कुटुंबीय आणि सर्व प्रशिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशिक्षक केदार शहा, अनिकेत वाकणकर आणि मंदार वाकणकर(पहिले प्रशिक्षक)यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि एक चांगला खेळाडू होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी टेनिस खेळूच शकले नसते असे मला वाटते. 

टेनिसमधील वैष्णवीची वाटचाल उत्तम प्रकारे चालू असल्याचे सांगून प्रशिक्षक केदार शहा म्हणाले की, तिचा खेळ पहिल्यापासून आक्रमक आहे. तिचे फटके ओघवते असतात आणि ती चेंडू जोरदार फाटकावते. 12 वर्षापर्यंत तिची वाटचाल अपेक्षित प्रकारे नसली तरी वयाबरोबर ती अधिक प्रगल्भ होत जाईल आणि वरच्या स्तरावर अधिक चांगली कामगिरी करू शकेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या टेनिसमध्ये ताकदवान फटके आणि उत्तम तंदरुसती हे यशासाठी आवश्यक घटक असून उच्च दर्जाची तंदरुस्ती राखता आल्यास वैष्णवीला त्या स्तरावर यश मिळू शकेल. 

फ्रेंच ओपनसाठी तिची तयारी चांगल्या प्रकारे सुरूअसल्याचे सांगून शहा पुढे म्हणाले की, आम्ही तिच्या तंदरुस्तीवर विशेष लक्ष दिले आहे. तसेच, क्ले कोर्टवर अधिक सराव करण्यावर भर दिला आहे. कोविड19 मुळे स्पर्धा होत नसल्याने प्रत्यक्ष सामने खेळण्याची तिची तयारी मात्र पुरेशी झालेली नाही. तरीही अतिशय आक्रमक  शैलीमुळे वैष्णवीला फ्रेंच ओपनमध्ये चांगली संधी आहे. मात्र त्यासाठी तिने दडपणाखाली चंगली कामगिरी करण्याची गरज आहे. 
बाऊन्स टेनिस अकादमी ही केदार शहा या च्या बाऊन्स स्पोर्ट्स अकादमीचाच एक भाग असून या ठिकाणी ज्युनिअर खेळाडूंप्रमाणेच प्रौढ खेळाडूंसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. असे सांगून ते म्हणाले की, या अकादमीत गेल्या सात वर्षात 6 राष्ट्रीय विजेते तयार झाले आहेत. तसेच, असंख्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटूही या अकादमीने दिले आहेत. अनुभवी प्रशिक्षक अनिकेत वाकणकर यांचा बाऊन्स टेनिस अकादमीच्या यशस्वी वाटचालीत आणि प्रशिक्षण कार्यक्रमात नेहमीच मोलाचा वाटा असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिसमध्ये उज्वल भवितव्य असणाऱ्या खेळाडूंमध्ये सिद्धांत बांठिया, ईश्वरी माथेरे, सालसा आहेर, अर्जुन गोहड, शिवानी इंगळे, आस्मि आडकर, देवांशी प्रभुदेसाई, कायरा चेतनानी, अमोघ दामले यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...