पुणे- थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत नाशिकच्या एनएसएफए संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय मिळवला.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत तनय कुमार(75धावा व 3-25) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर नाशिकच्या एनएसएफए संघाने पीवायसी डेव्हलपमेंट इलेव्हन संघाचा 74 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी एनएसएफए नाशिक संघाने 20षटकात 6बाद 176धावा केल्या. यात तनय कुमारने 48 चेंडूत 8चौकार व 3षटकारासह 75 धावांची खेळी केली. तनयला साई राठोड 21, नीलकंठ तनपुरे 14, राहुल भोरे 10 यांनी धावा काढून साथ दिली. याच्या उत्तरात पीवायसी डेव्हलपमेंट इलेव्हन संघाचा डाव 18 षटकात सर्वबाद 102धावावर संपुष्टात आला. यात धीरज सपकाळ 31, अभिजीत पाटोळे 28, अथर्व लेले 10 यांनी थोडासा प्रतिकार केला. एनएसएफए संघाकडून रोहित भोरे(4-9), तनय कुमार(3-25), यश थोरात(1-9), ध्रुव सेन(1-22) यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाचा विजय सुकर केला. सामनावीर तनय कुमार ठरला.
निकाल: साखळी फेरी:
एनएसएफए नाशिक: 20षटकात 6बाद 176धावा(तनय कुमार 75(48,8×4,3×6), साई राठोड 21(18), नीलकंठ तनपुरे 14, राहुल भोरे 10, यशराज सुरगोनिवार 3-29, वेदांत दारवाटकर 1-21)वि.वि.पीवायसी डेव्हलपमेंट इलेव्हन: 18 षटकात सर्वबाद 102धावा(धीरज सपकाळ 31(38,3×4), अभिजीत पाटोळे 28(26,2×4,2×6), अथर्व लेले 10, रोहित भोरे 4-9, तनय कुमार 3-25, यश थोरात 1-9 ध्रुव सेन 1-22);सामनावीर-तनय कुमार; एनएसएफए नाशिक संघ 74 धावांनी विजयी;

