मुख्य ड्रॉमध्ये चार भारतीय खेळाडूंचा सहभाग
पुणे, जानेवारी २९, २०२२ – भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरन आणि अर्जुन कढे यांना शनिवारी टाटा ओपन महाराष्ट्र २०२२ स्पर्धेसाठी पुरुष एकेरीच वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यान पार पडणार आहे.
प्रज्ञेशन आणि अर्जुनपूर्वी भारताच्याच युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना वाल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. यामुळे आता या स्पर्धेच्या मुख्य फेरीत चार भारतीय टेनिसपटू खेळतील.
अर्जुन हा पुण्याचाच खेळाडू असून, त्याने २०२० मध्ये पहिले राष्ट्रिय विजेतेपद मिळविले. प्रज्ञेश २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता आहे. दक्षिण पूर्व आशियातील या एकमेव एटीपी २५० मालिकेतील पूर्वीच्या तीन स्पर्धेत तो खेळला आहे.
भारतातील या सर्वात जु्न्या एटीपी स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य लॉन टेनस संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून, टाटा समूहाने या स्पर्धेला आर्थिक पुरस्कार दिला आहे.
अर्जुन आणि प्रज्ञेशला वाईल्ड कार्ड देताना आम्हाला आनंद होत आहे. एकावेळी चार भारतीय खेळाडूंना येथे खेळताना पाहण्याचा अनुभव नक्कीच अभिमानास्पद आहे. अर्जुन हा पुण्याचा असून, प्रज्ञेशही देशात चांगला लोकप्रिय आहे. सहजिक आता भारताची ताकद भक्कम झाली आहे. या चार खेळाडूंच्या समावेशामुळे भारताची सुरवात चांगली होईल. या स्पर्धेतून भारतीय खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा आणि संधी उपलब्ध करून देणे हे आमचे या स्पर्धा आयोजनामागील मुख्य उद्दिष्ट आहे, असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.
जगातील अव्ल खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे. यामध्ये १५व्या स्थानावरील अस्लन कारात्सेव, गतविजेता जिरी वेसेली आणि माजी युवा ऑलिंपिक विजेता कामिल मॅजच्राझेक यांच्यासह या आठवड्यात स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीचा खेळ रंगणार आहे. एकूणच चित्तथरारक टेनिस बघायला मिळेल यात शंका नाही.
अर्जुन आणि प्रज्ञेश दोघेही चांगले खेळाडू आहेत. सध्या सर्वोत्तम भारतीय टेनिसपटूंमध्ये त्यांची गणना होते. टाटा ओपन स्पर्धेमुळे त्यांना जगाती सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध होणारआहे. मर्यादित स्पर्धा संख्येमुळे आपल्या खेळाडूंना मायदेशात खेळण्याची फारशी संधी मिळत नाही. आता ही संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. ते याचा निश्चित फायदा उठवतील असा विश्वास राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी व्यक्त केला.
गेल्या स्पर्धेत प्रज्ञेशने उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी २८वर्षीय अर्जुनला विजेत्या वेसेलीकडून पराभव पत्करावा लागला होता.
या स्पर्धेची मालकी आयएमजीकडे असून, राईज वर्ल्डवाईडच्या वतीने भारतातील स्पर्धेचे आयोजन बघितले जाते. पात्रता फेरीचे सामने ३० आणि ३१ जानेवारीस खेळले जातील.

