पुणे-पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, सिंहगड रोड शाखा व केदारनाथ सार्वजनिक वाचनालय यांच्या विद्यमाने रविवार दि. 31 जानेवारी रोजी हाऊसिंग सोसायट्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 1 या वेळेत परिणय मंगल कार्यालयात ते होणार आहे. त्यात डीम्ड कन्व्हेय्ंस व पुनर्विकास या विषयावर सहकार तज्ञ मार्गदर्शन करतील. पाचशेहून अधिक प्रतिनिधी या चर्चासत्रास उपस्थित राहतील. वक्ते म्हणून खासदार गिरीश बापट, सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, राजाराम धोंडकर, सुहास पटवर्धन सहभागी होत आहेत . सहकारी गृहनिर्माण सोसायट्या व अपार्टमेंट्सच्या सभासद व पदाधिका-यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन शाखाध्यक्ष विकास वाळुंजकर यांनी महासंघातर्फे केले आहे.
सोसायट्यांसाठी रविवारी चर्चासत्र
Date:

