Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कंबोडियातील खडतर रॅलीत संजय टकले उपविजेता

Date:

पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने कंबोडीयातील आव्हानात्मक खमेर रॅली रेडमध्ये दुसऱ्या क्रमांकासह उपविजेतेदाचा करंडक जिंकला. आशिया क्रॉस कंट्री रॅलीत पाच वेळा जिंकलेल्या नाथ्थाफोन आंग्रीथानोन याने ही रॅली जिंकली. 
 
कंबोडियाने मोटरस्पोर्टसच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी या रॅलीचे खास आयोजन केले होते. संजयने 2011 मध्ये देशबांधव मुसा शरीफ याच्या साथीत 2011 मध्ये टी2 गटात विजेतेपद मिळविले होते. आशिया क्रॉस कंट्री जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. माजी विजेता या नात्याने संजयला संयोजक कम्पुचिया ऑटोस्पोर्ट रेसिंग एजन्सीने संजयला खास आमंत्रण दिले होते. संजयने थायलंडच्या इसुझु कारटेक डेलो संघाची इसुझु डी-मॅक्स कार चालविली. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हीगेटर होता.
 
संजयने सांगितले की, रॅलीसाठी थायलंडहून कंबोडियात प्रवेश केल्यानंतर व्हिएतनाम सीमेलगत मोंदुलकिरी प्रांतात मोठा प्रवास करावा लागला. संयोजकांनी फार योजनाबद्ध आयोजन केले होते. पारंपरिक पुजेने सुरवात झाली.
 
संजयने पहिल्या सुपर स्पेशल स्टेजमध्ये एक मिनिट 30 सेकंद वेळ नोंदविली. विचावत चोतीरावी याच्या साथीत तो संयुक्त दुसरा होता. यात नाथ्थाफोनची वेळ सरस होती. त्याची कार ऑस्ट्रेलियन स्पर्धकांनी चीनमधील सिल्कवे रॅलीत चालविली होती. डकार रॅलीच्या तांत्रिक निकषांनुसार ही कार बनविण्यात आली असून तिचे टेस्टींगही बरेच झाले होते.
 
दुसऱ्या सुपर स्पेशल स्टेजसाठी संजयला तिसऱ्या क्रमांकावरून सुरवात करावी लागली. विचावतने आशिया क्रॉस कंट्री रॅलीत सरस कामगिरी केल्यामुळे त्याला दुसरी स्टार्ट मिळाली. विचावतने दोन वेळा दुसरा, तर दोन वेळा तिसरा क्रमांक मिळविला आहे. संजयने एक विजेतेपद व एक उपविजेतेपद अशी कामगिरी केली आहे. 34 किलोमीटरच्या या स्टेजमध्ये संजयने कौशल्याच्या जोडीला सावधगिरी बाळगली. त्याने 28 मिनिटे 10 सेकंदांत ही स्टेज पूर्ण केली. विचावतची वेळ 29.09 सेकंद होती. संजयने त्यामुळे दुसरा क्रमांक गाठला.
 
ही  स्टेज खडतर होती. 26 किलोमीटर 77 मीटरच्या टप्यास गवत सुमारे 15 ते 20 फुट उंचीचे होते. त्यातून मार्ग कसाबसा दिसत होता. त्याशिवाय मार्ग सपाट नव्हता. त्यामुळे संजयची कार भरकटली, पण सुदैवाने त्यांना पुढील टप्पा लगेच मिळाला. त्यात सुमारे 50 ते 55 सेकंद वाया जाऊनही संजयने संयम ढळू दिला नाही. या मार्गात वेगवान सेक्शननंतर अचानक गुडघ्याइतके खोल खड्डे होते. काही ठिकाणी वाळुमुळे मार्ग निसरडा होता. त्यामुळे टायरना ग्रीप मिळत नव्हती. कहाही ठिकाणी रेलींग नसलेले लाकडी पुल होते. अशावेळी थान्याफातने संजयला वेळोवेळी सूचना दिल्या.
संजयने सांगितले की, थान्याफात फार नम्र आणि शांत स्वभावाचा आहे. त्याला क्रॉसकंट्रीचा अनुभव आहे. पश्चिम कंबोडियाच्या तुलनेत हा मार्ग वेगळा होता. त्याने अनुभवामुळे धोकादायक मार्गावर सावध केले.
तिसऱ्या स्टेजमध्ये वेगळेच अडथळे होते. त्यात पाणथळ जागा, खड्डे होते. 44 किलोमीटर 87 मीटरच्या या स्टेजमध्ये संजयसमोर नाथ्थाफोनचे आव्हान होते. नाथ्थाफोन ट्रकचे सुद्धा टेस्टींग करतो. तसेच त्याला क्रॉस कंट्रीचा बराच अनुभव आहे. अशावेळी संजयने खडतर स्टेजमध्ये धोका न पत्करता दुसरा क्रमांक कायम राखण्यास प्राधान्य दिले. काही ठिकाणी तीव्र उतार होते. नाथ्थापोनच्या  इसुझु डी-मॅक्सला चार किंग्ज शॉकअॅब्सॉर्बर्स होते. संजयच्या कारला थायलंडमध्ये बनविण्यात आलेले दोन सस्पेन्शन्स होती. या स्टेजचा परिसर व्हिएतनाम सीमेला लागून होता.
 
संजयने सांगितले की, रॅलीचे संयोजन चांगले झाले. 18 कार, 27 बाईक आणि आठ मोटो क्वाड््सचा सहभाग होता. नेदरलँड््स, न्यूझीलंड, इस्राईल, ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धकांनी भाग घेतला. काही स्पर्धकांच्या टोयोटा लँडक्रुझरला 4600 सीसी इंजिन होते. माझ्या इसुझुला 3000 सीसी इंजिन होते. त्यामुळे ही कामगिरी महत्त्वाची ठरली.
 
सविस्तर निकाल ः 1) नाथ्थाफोन आंग्रीथानोन-पीरापोंग सोमबुतवोंग (दोघे थायलंड-इसुझु डी-मॅक्स-एक तास सात मिनिटे 35 सेकंद), 2) संजय टकले-मिनील थान्याफात (भारत-थायलंड-इसुझु डीमॅक्स-1ः14.50), 3) पिट्टीफोन प्रोमचोटीकुल-प्रकोर्ब चावथाले (दोघे थायलंड-टोयोटा रिव्हो-1ः22.31), 4) सॅन डॅरीथ-रॉस रतानाक (दोघे कंबोडिया-टोयोटा लँडक्रुझर-1ः25.30), 5) ओरान-हेंग सोथीयालुक्ष (दोघे कंबोडिया-पोलॅरीस आरझेडआर-1ः25.44)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...